खोल समुद्रात ‘डार्क ऑक्सिजन’चा शोध
शेकडो वर्षे जुना सिद्धांत ठरणार चुकीचा
वैज्ञानिकांनी खोल समुद्रात ‘डार्क ऑक्सिजन’चा शोध लावला आहे. प्रशांत महासागराच्या खोल भागात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पंप करत आहे. हा डार्क ऑक्सिजन अत्यंत खोलवर असून तेथे सूर्यकिरणे पोहोचत नाही, यामुळे तेथे फोटोसिंथेसिस अशक्य असल्याचे या संशोधन अहवालात म्हटले गेले आहे. नेचर जियोसायन्स नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.
समुद्रसपाटीपासून सुमारे 4 हजार मीटर खोल पूर्ण काळोखात ऑक्सिजनची निर्मिती होत असून याला डार्क ऑक्सिजन नाव देण्यात आले आहे. सूर्यप्रकाशाशिवाय ऑक्सिजन तयार होऊ शकत नसल्याचे वैज्ञानिक मानत राहिले आहेत. अशा स्थितीत या संशोधनामुळे वैज्ञानिक अचंबित झाले आहेत. कारण हे संशोधन प्रकाश संश्लेषणाद्वारे ऑक्सिजन निर्माण होण्याच्या सिद्धांताला आव्हान देणारे आहे.
समुद्रात अत्यंत खोलवर ऑक्सिजनची निर्मिती होणे अशक्य मानले जाते, कारण तेथे रोपांसाठी प्रकाश संश्लेषण करण्याकरता पुरेसा सूर्यप्रकाश नसतो. तसेच डार्क ऑक्सिजनच्या ठिकाणी रोपांकडून ऑक्सिजनची निर्मिती होत नाही. या संशोधनातून आमच्या ग्रहावर ऑक्सिजनसाठी प्रकाश संश्लेषणासोबत आणखी एक स्रोत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीच्या सुरुवातीसंबंधी एक नवी चर्चा जन्म घेणार असल्याचे संशोधनाचे सहलेखक अॅन्ड्य्रू स्वीटमॅन यांनी म्हटले आहे.
ऑक्सिजन धातूच्या ‘नोड्यूल्स’मधून निघतो, जो कोळशाच्या ढिगासमान असतो. ते एच2ओ अणुंना हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभागतात असे संशोधनात म्हटले गेले आहे. ग्रहावर एरोबिक जीवनाच्या सुरुवातीसाठी ऑक्सिजन असणे आवश्यक होते. पृथ्वीचा ऑक्सिजन पुरवठा प्रकाश संश्लेषक जीवांमुळे सुरू झाल्याचे आमचे मानणे होते. पर।तु नव्या संशोधनानुसार खोल समुद्रात ऑक्सिजन निर्माण होत असून तेथे कुठलाच प्रकाश नाही. याचमुळे जीवसृष्टी कशी अस्तित्वावत आली यावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. महासागरीय आणि वायुमंडळीय व्यवस्थेनुसार पृथ्वीवरील ऑक्सिजनचे निम्मे प्रमाण हे समुद्रापासून प्राप्त होते असे स्वीटमॅन यांनी नमूद केले आहे.