कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भूकेला नियंत्रित करणाऱ्या प्रोटीनचा शोध

06:35 AM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्थुलत्वावरील उपचार वैज्ञानिकांना सापडला

Advertisement

जगभरात भूकेला पर्यायाने वजनाला नियंत्रित करण्याच्या सोप्या पद्धती शोधल्या जात आहेत. यावर स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक नवा शोध लावला आहे. हा शोध स्थुलत्वाशी झगडणाऱ्या लोकांसाठी आशेचा किरण ठरू शकतो. संशोधनानुसार हा प्रोटीन आमच्या मेंदूत भूकेला नियंत्रित करण्यास मदत करू शकतो.

Advertisement

भूकेचा ‘स्विच’

एमआरएपी2 प्रोटीन मेंदूत आढळून येणाऱ्या एमसी4आर रिसेप्टरला सक्रीय करतो, असे वैज्ञानिकांना संशोधनात आढळून आले आहे. हा रिसेप्टर शरीराला आता खाणे थांबवा, असा संदेश देतो. जेव्हा हा सिग्नल मजबूत होतो, तेव्हा भूकेवर नियंत्रण करणे सोपे ठरते. जर या प्रोटीनच्या सक्रीयतेला वाढविण्यात आले किंवा याची काम करण्याची पद्धत समजून घेण्यात आल्यास स्थुलत्व कमी करण्यास मदत करणारी औषधे निर्माण करता येऊ शकतात, असे संशोधकांचे सांगणे आहे.

स्थुलत्व मोठी समस्या

जगभरात सध्या कोट्यावधी लोक स्थुलत्वाला तोंड देत आहेत. भारतातही शहरी भागात स्थुलत्व वेगाने वाढत आहे. जगभरात लोकांचे राहणीमान बदलले असून कमी वयाच्या मुलांनाही सहजपणे जंक फूड उपलब्ध होत आहे. तर किशोरवयीनांमध्ये तणाव देखील स्थुलत्वाचे कारण आहे. एमआरएपी2 चा शोध वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी आशेचा किरण आहे.

तज्ञांचे काय म्हणणे?

या प्रोटीनला लक्ष्य करत साइड इफेक्ट्स नसलेली थेरपी निर्माण केली जाऊ शकते. मानवी परीक्षणापर्यंत पोहोचण्यासाठी याकरता अजून काही वर्षे लागू शकतात,  असे स्टॅनफोर्डच्या संशोधकांचे सांगणे आहे.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article