महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

झारखंडच्या सोरेन कुटुंबात कलह

06:37 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपमध्ये सीता सोरेन यांचा प्रवेश : शिबू सोरेन यांच्या सून

Advertisement

वृत्तसंस्था/ रांची

Advertisement

झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अलिकडेच नोटच्या बदल्यात व्होट प्रकरणी सीता सोरेन यांचे नाव समोर आले होते. विशेष सीबीआय न्यायालयासमोर खटल्याचा तोंड द्यावे लागणार असल्याचा आदेश अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सीता सोरेन या झामुमोचे माजी प्रमुख शिबू सोरेन यांच्या सून तसेच माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिवंगत बंधूंच्या पत्नी आहेत. सीता सोरेन या दुमकामधील जामा मतदारसंघात तीनवेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

सीता सोरेन यांचे पती दुर्गा सोरेन यांचे निधन झाले आहे. तर हेमंत सोरेन हे सध्या तुरुंगात आहेत. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांच्याजागी चंपई सोरेन हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर सीता सोरेन यांनीही मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला होता.

झारखंडच्या नेत्या सीता सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचे बळ वाढले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत याचा वेगळा प्रभाव दिसून येणार आहे. आम्ही झारखंडमध्ये शक्तिशाली होत आहोत असे उद्गार भाजप नेते विनोद तावडे यांनी यावेळी काढले आहेत.

आज आम्ही विशाल परिवारात सामील होत आहोत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशभरात विकास होत आहे. सर्वजण मिळून देशाच्या विकासात स्वत:चे योगदान देत आहेत. मी देखील झारखंडमये अनेक संघर्ष केले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चामध्ये मी 14 वर्षे कार्यरत राहिली आहे. माझे सासरे शिबू सोरेन आणि पती दुर्गा सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंड हे वेगळे राज्य निर्माण झाले. या दोघांनी राज्याच्या विकासासाठी कार्य केले. माझ्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न होता, परंतु झारखंड आजही विकासापासून खूप दूर आहे. आम्हाला झारखंड वाचवायचा असून न्याय मिळवून द्यायचा आहे. याचमुळे मी मोदींच्या परिवारात सामील झाल्याचे वक्तव्य सीता सोरेन यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#Political
Next Article