For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चांदोली धरणातून ८८७४ क्यूसेकने प्रतिसेकंद विसर्ग : ८५.१३ टक्के धरण भरले! वारणाकाठ जलमय

02:21 PM Jul 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
चांदोली धरणातून ८८७४ क्यूसेकने प्रतिसेकंद विसर्ग   ८५ १३ टक्के धरण भरले  वारणाकाठ जलमय
Chandoli dam
Advertisement

वारणानगर / प्रतिनिधी

वारणा नदीचा जलसाठा असलेल्या वसंत सागर या चांदोली धरणात अतिवृष्टीमुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे १ मिटर ने उचलून पात्रात मंगळवार दि.२३ पासून सुरू केलेल्या विसर्गात आज सकाळी ११.३० वाजता वाढ केल्यामुळे वारणा नदी काठच्या गावांना महापूराचा धोका वाढला असून नदीकाठचा परिसर जलमय झाला आहे.

Advertisement

चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असून आज धरणात २९.२९ टीएमसी पाणीसाठा होऊन धरण ८५.१३ टक्के भरले आहे.जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे.धरण क्षेत्रात आजपर्यंत १९०३ मि.मी. पाऊस पडला असून गेल्या सात दिवसांत ६०६ मि.मी. पाऊस पडला आहे त्यामुळे सात दिवसात ७.७९ टीएमसी धरणात पाण्याची आवक झाली आहे. आजही मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे.

काल मंगळवार सकाळी ११ वा. वीजनिर्मिती केंद्रातून १६०० व वक्र द्वारातून २२०० क्युसेक असा ३८०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू केला होता यामध्ये आज बुधवारी सकाळी ११.३० वाजता वाढ करण्यात आली असून वीजनिर्मितीसाठी १६५८ व वक्रद्वारमधून ७२१६ असा ८८७४ क्युसेक प्रतिसेंकद विसर्ग करण्यात आला असून महापुराचा धोका अधिक वाढला आहे.

Advertisement

यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले असून इशारा पातळी ओलांडली आहे नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आहे दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात आला आहे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आल्याचे पाटबंधारे कोडोली उपविभागाचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यांनी दिला आहे.

Advertisement

.