महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चांदोली धरणातून विसर्ग वाढवला, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा : ८८. ७३ टक्के धरण भरले

01:12 PM Jul 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
Chandoli dam
Advertisement

१५७८५ क्यूसेसने प्रतिसेकंद विसर्ग

वारणानगर / प्रतिनिधी

वारणा नदीचा जलसाठा असलेल्या वसंत सागर या चांदोली धरणात अतिवृष्टीमुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे त्यामुळे धरणाचे चार दरवाजे उचलून पात्रात मंगळवार दि.२३ पासून सुरू केलेल्या विसर्गात आज शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता वाढ केल्यामुळे वारणा नदी काठच्या गावांना महापूराचा धोका वाढला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असून आज धरणात ३०.५३ टीएमसी पाणीसाठा होऊन धरण ८८. ७३ टक्के भरले आहे.जलाशय परिचालन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग चालू झाल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूची शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे.धरण क्षेत्रात आजपर्यंत २२४३ मि.मी. पाऊस पडला असून गेल्या नऊ दिवसांत ९६२ मि.मी. पाऊस पडला आहे त्यामुळे नऊ दिवसात ९.०३ टीएमसी धरणात पाण्याची आवक झाली आहे. आजही मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे.

Advertisement

मंगळवार सकाळी ११ वा. वीजनिर्मिती केंद्रातून १६०० व वक्र द्वारातून २२०० क्युसेक असा ३८०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू केला होता यामध्ये आज शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता वाढ करण्यात आली असून वीजनिर्मितीसाठी १३०५ व वक्रद्वारमधून १४४८० असा १५७८५ क्युसेक प्रतिसेंकद विसर्ग करण्यात आला असून महापुराचा धोका अधिक वाढला आहे.

वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले असून इशारा पातळी ओलांडली आहे नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आहे दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढविण्यात येत आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे तसेच आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलीस दलाला याबाबत लेखी कळवण्यात आल्याचे पाटबंधारे कोडोली उपविभागाचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :
Chandoli Damriver Warnatarun bharat newswarning river
Next Article