कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पात्रता फेरीतच भारतीय युवा खेळाडूंकडून निराशा

06:19 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा

Advertisement

वृत्तसंस्था/ तैपेई

Advertisement

भारताचे युवा बॅडमिंटनपटू येथे सुरू झालेल्या तैपेई ओन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या पात्रता फेरीत प्रभाव दाखवण्यात अपयशी ठरल्याने त्यांना मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळविता आला नाही. पात्रतेच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावे लागले.

मनराज सिंगला मलेशियाच्या टॅन जिया जीकडून 21-9, 19-21, 20-22 असा पराभव स्वीकारावा लागला. रघू मरिस्वामीला इंडोनेशियाच्या मोहम्मद झाकी उबेदिल्लाहने 21-16, 21-17 असे नमविले तर महिला एकेरीत मानसी सिंगला थायलंडच्या पिटचामन ओपातनिपुथने 21-17, 21-10 असे हरविले.

तत्पूर्वी रघूने मकाऊच्या पुइ पांग फाँगवर 14-21, 21-16, 21-14 अशी मात केली होती तर मनराजने स्थानिक खेळाडू चेंग कायवर 19-21, 21-13, 21-11, आणि मानसीने तैपेईच्या त्साय, हसिन पेइवर 22-20, 14-21, 21-17 अशी मात केली होती. अन्य खेळाडूंत आर्यमान टंडन मलोशियाच्या कोक जिंग हाँगकडून 27-25, 10-21, 8-21 असे पराभूत झाला तर मिथुन मंजुनाथला टॅन जिया जीने 21-17, 19-21, 9-21 असे हरविले.

महिला एकेरीत इशारानी बारुआ, इरा शर्मा, श्रेया लेले यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. इशारानीने कडवा प्रतिकार केला, पण तिला पिटचामनकडून 7-21, 23-21, 22-24 असा तर इरा शर्माला चेन यु सु हिने 7-21, 18-21 आणि श्रेयाला जपानच्या सोरानाने योशिकावाकडून असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article