पोलीस महासंचालकांकडून सालीमठ यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
बेळगाव : कार अपघातात सजीव दहन झालेले पोलीस निरीक्षक पंचाक्षरय्या वीरय्या सालीमठ यांच्या मुरगुड ता. सौंदत्ती येथील मूळ गावी मंगळवारी राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. मृत पोलीस निरीक्षक पंचाक्षरय्या हे मूळचे मुरगुड ता. सौंदत्ती येथील. सध्या राजीव गांधीनगर गदग येथे राहत होते. तसेच ते लोकायुक्त विभागात कार्यरत होते. बैलहोंगल न्यायालयात त्यांची 5 डिसेंबर रोजी साक्ष होती. त्यामुळे ते गदग येथील आपल्या घरातून केस फाईल घेऊन केए 24 एम 6393 या कारमधून 5 डिसेंबर रोजी बैलहोंगकडे निघाले होते. हावेरी येथून हुबळीमार्गे गदगकडे जाताना सायंकाळी गदग-हुबळी राष्ट्रीय महामार्ग-67, अण्णीकेरी-भद्रापूर दरम्यानच्या आरेर ब्रिजनजीक रस्त्यात कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात ताबा सुटल्याने कारची दुभाजकाला धडक बसली. भरधाव जाऊन रस्त्याकडेला जाऊन अचानक कारने पेट घेतल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळे मंगळवारी भेट देऊन कुटुंबीयांना धीर देत सांत्वन केले.