कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करा
बेळगाव : राज्यात महानगरपालिका, नगरपंचायतीमध्ये कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. चालक, क्लीनर यांच्या खात्यात थेट वेतन जमा करावे, अशी मागणी महापालिका आऊटसोर्सिंग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष एम. बी. नागनगौडा यांनी केली. शहरातील सदाशिवनगर येथील आंबेडकर भवन येथे बेळगाव महानगर संघाच्या बैठकीत ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकारी व कंत्राटदार वेळच्यावेळी वेतन तसेच भविष्य निर्वाह निधी रक्कम देत नाहीत. त्यामुळे कामगारांची पिळवणूक होत असल्याने हे प्रकार तात्काळ थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी किरण हंचिनमनी यांची संघटनेच्या बेळगाव अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सचिवपदी रवी कोळकर, सचिवपदी नदाफ गौस, उपसचिवपदी रमेश कांबळे, तर खजिनदारपदी रशीद बस्सापुरी यांची निवड झाली. व्यासपीठावर बेळगाव विभाग समन्वयक, राजू होसमनी, जिल्हाध्यक्ष यल्लाप्पा बेवनगी, विशाल चलवादी, रुद्रप्पा चंदरगी यासह इतर उपस्थित होते.