महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मॅरेथॉन स्पर्धकांसाठी ‘मार्ग’दर्शन, वेळापत्रक आणि सूचना

06:00 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व एनजीओ लोककल्प फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य मॅरेथॉन 2025 या बहुप्रतीक्षित उपक्रमाचे आयोजन 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता, आरपीडी कॉलेज ग्राउंड, बेळगाव येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ धावण्याची नाही तर फिटनेस, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीला प्रोत्साहन देणारे एक अद्वितीय व्यासपीठ आहे. या मॅरेथॉनसाठी भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांनी 11 जानेवारी 2025 रोजी आपले मॅरेथॉन किट आरपीडी कॉलेज ग्राउंड, बेळगाव येथे दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत घेऊन जावे. किटमध्ये बिब, टी-शर्ट, मॅरेथॉनसाठी आवश्यक वस्तूंचा समावेश असेल. किट मिळवताना ओळखपत्र व नोंदणी पुष्टीपत्र/संदेश सोबत आणणे आवश्यक आहे.

Advertisement

सर्व सहभागी स्पर्धकांची सुरक्षितता आणि सोयीसाठी मॅरेथॉनच्या मार्गामध्ये पाणीपुरवठा, वैद्यकीय केंद्र आणि आरपीडी कॉलेज ग्राउंड, मराठा मंदिर, मिलिटरी महादेव / पॉप इन् आणि उत्सव सर्कल अशा चार ठिकाणी ऊग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. सहभागी स्पर्धकांच्या मदतीसाठी आणि अधिक माहितीसाठी  7795972635, 8618034063, 8123374824 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या स्पर्धेस दैनिक तरुण भारत यांचे मीडिया पार्टनर, हॉस्पिटॅलिटी पार्टनर आयटीसी हॉटेल तसेच श्री अरिहंत उद्योग आणि एज्युकेशन ग्रुप, आयसीआयसीआय लोंबार्ड, युनियन बँक ऑफ इंडिया, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, पु. ना. गाडगीळ सराफ आणि जव्हेरी, येस बँक यांचे सहप्रायोजक तसेच कॅनरा बँक, ग्लॅमर मफतलाल, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स, रचना इन्फोटेक, सी हॉर्स आणि सिनर्जी यांचे सहकार्य लाभले आहे.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article