टिस्का चोप्रा करणार दिग्दर्शन
मनीष मल्होत्रा निर्मात्याच्या भूमिकेत
स्वत:च्या अभिनयासाठी ओळखली जाणारी टिस्का चेप्रा आता ‘साली मोहब्बत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी मनीष मल्होत्राने स्वीकारली आहे. मी कहाण्यांमध्ये स्वारस्य बाळगते, याची कहाणी ऐकविण्यात आल्यावर मी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. मनीष मल्होत्राला मी पूर्वीपासून ओळखते, असे टिस्काने म्हटले आहे.टिस्काने यापूर्वी लघूपट दिग्दर्शित केला होता. याचमुळे टिस्काने चित्रपट दिग्दर्शित करण्यापूर्वी पटकथेपासून कलाकारांची निवड करण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. मी स्वत:ला फिल्ममेकर मानते. मी लेखिका आणि कलाकार देखील आहे. क्राइम थ्रिलर धाटणीचा चित्रपट साकारण्याचे आव्हान मी पेलले आहे. माझे काम कहाणीसोबत प्रेक्षकांना जोडणे असून मी तेच केले असल्याचा दावा टिस्काने केला आहे. टिस्काच्या या चित्रपटात राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहे. तर दिव्येंदु शर्माने यात नायकाची भूमिका साकारली आहे. दिव्येंदु हा प्रतिभाशाली कलाकार आहे. तो अभिनयाद्वारे जादू करणारा कलाकार आहे. राधिकासाब्sात काम करणे सोपे असल्याचे उद्गार टिस्काने काढले.