For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पृथ्वीवर पुन्हा अवतरले डायर वोल्फ

06:22 AM Apr 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
पृथ्वीवर पुन्हा अवतरले डायर वोल्फ
Advertisement

12 हजार वर्षांपूर्वी झाले होते विलुप्त : अमेरिकेतील कंपनीने केला चमत्कार

Advertisement

अमेरिकेच्या डलास येथील बायोटेक कंपनी कोलोसॅल बायोसायन्सेसने विलुप्त झालेल्या प्राण्यांसंबंधी मोठी घोषणा केली आहे. कोलोसॅल बायोसायन्सेसने विलुप्त प्राण्यांना पुन्हा अस्तित्वावत आणण्याच्या स्वत:च्या साही मिशनमध्ये एक यश मिळाल्याची घोषणा केली आहे.

कंपनीने तीन डायर वोल्फ (लांडगे) निर्माण केले आहेत. गेम ऑफ थ्रोसनमध्ये दाखविण्यात आलेली ही एक लोकप्रिय प्रजाती असली तरीही 12000 वर्षांपासून पृथ्वीवर दिसून आलेली नाही. कोलोसॅलने 2022 मध्ये वूली माउसला पुन्हा अस्तित्वावत आणण्यायच स्वत:च्या लक्ष्याची घोषणा केली होती. तर कंपनीला यापूर्वी एक मॅमथ निर्माण करण्यास यश मिळाले होते.

Advertisement

जेनेटिक इंजिनियरिंग कंपनी कोसोसॅल बायोसायन्सेसने डी-एक्सटिंक्शन टेक्नॉलॉजीजच्या मदतीने हे यश मिळविले आहे. कंपनीने स्वत:च्या जीन-एडिटिंग तंत्रज्ञानाला केवळ प्रागैतिहासिक चमत्कारांना परत आणण्याच्या पद्धतीच्या स्वरुपात सादर केले नसून आरोग्य आणि बायोडायव्हर्सिटी कोलोसॅलमध्ये देखील याचा उल्लेख केला आहे.

डायर वोल्फच्या तीन पिल्लांचे वजन प्रत्येकी 80 पाउंड असून त्यांना रेट्रस, रोमुलस आणि मादी पिल्लाला खलिसी नाव (गेम ऑफ थ्रोन्समधील लोकप्रिय व्यक्तिरेखा) नाव देण्यात आले आहे. पिल्लांना अमेरिकेतील एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून ते विशेष स्वरुपात तयार करण्यात आलेल्या किबलसोबत प्राण्यांचे मांस खात आहेत. डायर वोल्फचा आकार एका ग्रे वोल्फपेक्षा सुमारे 20 ते 25 टक्क्यांनी अधिक आहे.

पूर्णपणे विकसित झाल्यावर डायर वोल्फचे वजन 140 पाउंड असेल असा अनुमान कंपनीने व्यक्त केला आहे. जर आम्ही यशस्वी ठरलो तर मानवी आरोग्य देखभाल आणि संरक्षणात मदत करू शकणारी तंत्रज्ञानं विकसित करू शकतो असे उद्गार कोलोसॅलचे सीईओ बेन लॅम यांनी काढले आहेत.

कंपनीचा उद्देश

कंपनीचे लक्ष दीर्घकाळापासून विलुप्त प्राण्यांना पुन्हा अस्तित्वात आणणे ओ. यात डोडो आणि टास्मानियन वाघ सामील आहे. परंतु या उद्दिष्टामुळे पॅलियो-जेनेटिकिस्टांना चिंता वाटू लागली आहे. तसेच नैसर्गिक जगात हेरफेर करण्याच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परंतु कंपनीने स्वत:च्या समर्थकांना निराश केले नाही.

Advertisement
Tags :

.