महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंग्राळी खुर्द येथून पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना

10:32 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक 

Advertisement

कंग्राळी खुर्द येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणारी पायी दिंडी शुक्रवार दि. 5 रोजी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. सध्या सदर दिंडी निडसोसी येथे पोहोचली आहे. सीमाभागातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या अनेक पायी दिंड्याचे कर्नाटक हद्दीत दिंडी मार्गावर अभूतपूर्व स्वागत होत आहे. सीमाभागातून कंग्राळी खुर्द, आंबेवाडी, केदनूर, येळ्ळूर, सुळगा, धामणे, सांबरा, अष्टे, निलजीसह 10 पेक्षा अधिक गावच्या पायी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.

Advertisement

या सर्व दिंड्या 10 तारखेपर्यंत महाराष्ट्र हद्दीत प्रवेश करणार आहेत. सध्या कर्नाटक हद्दीत या सर्व दिंड्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून, गावागावात रांगोळ्या काढून दिंडीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर, रथावर फुलांची उधळण करत स्वागत होत आहे. वारकऱ्यांची निवासाची तसेच नाष्टा, पाण्याची जागोजागी सोय करून वारकऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत. जागोजागी रिंगण सोहळे, भजन, कीर्तन आयोजित करून विठूरायाच्या भक्तीरसात तल्लीन होत आहेत. सध्या जवळ जवळ 4 हजार पेक्षा जास्त भाविक पायी दिंडीतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article