कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur : दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळेना!

06:10 PM Oct 28, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

           सोलापुरात राजकीय चर्चांना उधाण!

Advertisement

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्यापही अनिश्चित आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कधी होणार याविषयी राजकीय गोटासह जनसामान्यांमध्ये विलक्षण उत्सुकता आहे.

Advertisement

ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री सोलापुरात राजकीय बॉम्ब फुटला होता. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे यांच्यासह माजी नगरसेवक सुरेश पाटील, गुरुशांत धुत्तरगांवकर, सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेविका कल्पना क्षीरसागर व इतर जणांनी १६ ऑक्टोबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने सोलापूर शहराच्या राजकीय गोटात खळबळ उडाली होती.

याच दिवशी मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटणाऱ्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील आमदार यशवंत माने, माजी आमदार दिलीप माने व राजन पाटील या दिग्गज राजकारण्यांचादेखील समावेश होता. हे तिघेही भाजपमध्ये प्रवेश करणार यावर त्यादिवशी शिक्कामोर्तब झाले होते. यापैकी आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील आदींचा पक्षप्रवेश बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी मुंबई होणार आहे,

मात्र दिलीप माने यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरला नाही. प्राप्त माहितीनुसार १ नोव्हेंबर रोजी सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापुरात मोठा कार्यक्रम घेऊन दिलीप माने यांचा पक्षप्रवेश करण्याचे नियोजन होते, मात्र दक्षिण तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलीप माने यांच्या प्रवेशास काही दिवसापूर्वी विरोध करत कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यामुळे माने यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला आहे. दरम्यान कितीही विरोध झाला तरी दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याची माहिती आहे. यामुळे लवकरच माने यांचा पक्षप्रवेश होणार आहे.

अद्याप तारीख ठरली नाही : तडवळकर

माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशसंदर्भात अद्याप पक्षाकडून तारीख निश्चित झाली नाही, अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सोमवारी दिली. दरम्यान तडवळकर यांनी दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशविरोधात दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची माहिती प्रदेश भाजपला कळविली आहे. यावर पक्षाकडून नक्की काय भूमिका घेतली जाते याविषयी उत्सुकता आहे.

Advertisement
Tags :
@BJP_NEWS#DilipMane#Maharastra#SolapurPolitics#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaPoliticalSuspenseSolapur Politics
Next Article