Kolhapur : दिल को दिल रहने दिया, बाज़ार नहीं बनाया’…स्टेटस ठेवत कोल्हापुरतील तरुणाची आत्महत्या!
लग्नाच्या नैराश्यातून कोल्हापुरात तरुणाची आत्महत्या
कोल्हापूर : कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतील ३० वर्षीय सुमित विक्रांत तेली या तरुणाने व्हॉट्सअॅप स्टेटसवर “मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे… ‘दिल को दिल रहने दिया, बाज़ार नहीं बनाया’” असा भावनिक संदेश ठेवून काही तासांतच शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेत आपले जीवन संपवले
गुरुवारी (दि. २७) सकाळी साडेदहाच्या सुमारास मिळालेल्या मृतदेहाने संपूर्ण परिसराला हादरवून टाकलं करवीर पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,सुमित तेली हा आई, वडील, लहान भावासोबत शुक्रवार पेठेत राहत होता. शाहूपुरीतील रेडीयम दुकानात तो कामाला जात होता. गेले काही दिवस त्याच्या लग्नाची चर्चा नातेवाईकांत सुरू होती. घरीही तुलसी विवाहानंतर लग्नाबाबत घडामोडी सुरू होत्या. परंतु, लग्न जमत नसल्याने तो नैराश्येत होता.
बुधवारी रात्री शिवाजी पुलावर पोहोचलेल्या सुमितने थेट पाण्यात उडी मारली. काही वेळातच त्याचा भाऊ घटनास्थळी पोहोचला.घाबरलेल्या आवाजात आरडाओरडा, मदतीसाठी त्याने धावा केला पण अंधार आणि पाण्याच्या प्रवाहात सुमित कुठेच नजरेस पडला नाही. रात्री शोधमोहीम थांबवण्यात आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला या घटनेने सुमितचे मित्र आणि कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर.कोसळला..