Karad News : सुप्रिया सुळेंसह मान्यवरांची यशवंतरावांना आदरांजली
कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा स्मरणसोहळा
कराड : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळावर मान्यवरांनी आदरांजली अर्पण केली. समाधीस्थळी नगरपालिकेच्यावतीने भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार शशिकांत शिंदे, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, सारंग पाटील आदींनी समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. समाधीस्थळावरील पर्णकुटीसमोर नगरपालिकेच्या वतीने भजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते तेथेही उपस्थिती लावली.
माजी जिल्हा परिषद सदस्यमानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे नेते अजितराव पाटील, तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, राजेंद्रसिंह यादव, झाकीर पठाण, स्मिता हुलवान, सौरभ पाटील, विजय बाटेगावकर, सागर शिवदास, पोपटराव साळुंखे, फारूक पटवेकर, सुवर्णा पाटील, अख्तर आंबेकरी, संगीता साळुंखे, माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, एकनाथ बागडी,प्रदीप जाधव, प्रशांत यादव, माजी सभापती प्रणव ताटे, पै. संतोष वेताळ, आदी उपस्थित होते.
तसेच प्रांत अतुल म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, मुख्याधिकारी कपिल जगताप, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड राजू ताशीलदार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भोसले यांच्यासह निवडणूक शाखेचे सर्व पथक प्रमुख यांच्यासह लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, प्रीतिसंगम हास्य क्लब, यशवंतराव चव्हाणप्रेमी नागरिक यांच्यासह विद्यार्थ्यांनी समाधीस्थळी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण केली.