कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli : विटा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मान्यवरांची चर्चा

02:55 PM Nov 03, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

  नागरिकांच्या कल्पना प्रत्यक्ष आराखड्यात उतरविण्याचे आमदारांचे आश्वासन

Advertisement

विटा : विटा शहराला औद्योगिक परंपरा आहे. येथील यंत्रमाग आणि पोल्ट्री व्यवसायाने नावलौकिक मिळवून दिला आहे. मात्र शहरात नवीन उद्योग उभा राहिले पाहिजेत. त्यातून लोकांचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. त्याशिवाय बाजारात आर्थिक उलाढाल होणार नाही. त्यासाठी विट्यात औद्योगिकिकरणाला पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे, असा सूर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला.

Advertisement

आमदार सुहास अनिलभाऊ बाबर यांच्या संकल्पनेतून २विट्याच्या विकासाच्या भविष्यातील संकल्पना या विषयावर शहरातील विविध मान्यवरांची चर्चा येथील सुरभी हॉलमध्ये पार पडली. शहराच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आमदार सुहास बाबर यांनी स्पष्ट

या कार्यक्रमाला शहरातील व्यापारी, उद्योगपती, सामाजिक संस्था, शिक्षक, महिला प्रतिनिधी, युवक यांच्यासह साहित्यिक, आरोग्य, वकील, फ्लॉवर मर्चट, ट्रॅव्हलर्स, फोटोग्राफर, भाजी विक्रेते, डॉक्टर्स, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, रिक्षाचालक, ट्रेलर, दुकानदार, सलून, हार्डवेअर, कापड व्यावसायिक, अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित लोकांनी आपल्या क्षेत्राशी संबंधित विकासाच्या मांडल्या. शहराच्या संकल्पना वाहतूक व्यवस्थेपासून स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक विकास, रोजगार, व्यवसाय, अशा विविध अंगांवर सखोल चर्चा झाली. नागरिकांनी शहराच्या प्रगतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना मांडल्या.

यावेळी आमदार सुहास बाबर यांनी मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्ष कृती आराखड्यात उतरविण्याची ग्वाही दिली. यावेळी आमदार बाबर म्हणाले, नागरिकांच्या कल्पना आणि अपेक्षा लक्षात घेऊन प्रत्येक संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होईल. शहरातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि सहकार्य हेच खऱ्या अर्थान विकासाचे बळ आहे. विटा शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास घडवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचे एकत्रित प्रयत्न महत्वाचे ठरणार आहेत.

वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सार्वजनिक सोयीसुविधा, हरित उपक्रम आणि रोजगार निर्मिती यांसारख्या विषयांवर अनेक अभिनव कल्पना समोर आल्या. शहराच्या विकासाच्या दृष्टीने असा उपक्रम वारंवार व्हावा, असे नागरिकांनी नमूद केले. शहराच्या भविष्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्याची ही कल्पना अभिनव आणि प्रेरणादायी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :
#CitizenParticipation#CityPlanning#smartcity#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#UrbanDevelopmentsangli newsVitaDevelopment
Next Article