डिजिटल डिटॉक्स-मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी अत्यावश्यकच
आजकाल डिजिटायझेशन इतके वाढले आहे की आता फोन आणि लॅपटॉपशिवाय कोणतेही काम करता येत नाही. आपल्याला इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे इतके व्यसन लागले आहे की, एक मिनिटही फोनशिवाय बसणे किंवा कोणतेही काम करणे आपल्यासाठी कठीण झाले आहे. तर अशातच एक टर्म अशी आहे जी खूप चर्चेत आहे ती म्हणजे ‘डिजिटल डिटॉक्स’. एका विशिष्ट ठराविक काळासाठी फोन, टॅब्लेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहण्याला डिजिटल डिटॉक्स म्हणतात. ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो. त्याचप्रमाणे, सतत इंटरनेटवर सक्रिय राहणे हे देखील एका व्यसनासारखे आहे जे तुमच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवते. सतत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.
जास्त वेळ क्रीन बघत बसल्याने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे डिजिटल डिटॉक्स करणे अत्यावश्यक आहे. डिजिटल डिस्ट्रॅक्शन हा यामागचा उद्देश आहे. यात तुम्ही क्रीनपासून लांब राहून खऱ्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींचा अनुभव घेता. लोक अनेक तास फोन आणि लॅपटॉपवर विविध गोष्टी पाहत असतात. पण अनेक तास रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ बघत राहिल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. झोपेच्या वेळी क्रीनवर रील्स पाहण्यात जास्त वेळ घालवल्यामुळे तरुण तसेच मध्यमवयीन लोकांना हायपरटेन्शनचा त्रास जाणवत असल्याचं समोर आलं आहे. फोन किंवा लॅपटॉपचा जास्त वापर केल्याने शारिरीक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. जास्त वेळ फोन किंवा लॅपटॉप वापरल्याने डोळे, हृदय, वजन, झोप, फोकस यावर परिणाम होतो.
सध्या स्मार्ट फोन आणि समाजमाध्यमे लोकांचे जीवन नियंत्रित करीत आहेत आणि त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मेंदूच्या कार्यक्षम कार्यावर विपरीत परिणाम होतो आहे असे तज्ञांचे मत आहे. स्मार्ट फोनमुळे मेंदूत कांही साठवून ठेवण्याची गरज नाही असे वापरणारे समजतात. त्यामुळे सततचा विसरभोळेपणा, भिरभिरपणा ही लक्षणे आढळून येत आहेत. टेम्पररी मेमरी व व्हिज्युअल मेमरी वर यामुळे वाईट परिणाम होतो. स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे ‘स्व’ शी व स्वत:च्या अंतर्मनाशी तुटकपणा जाणवल्याचे प्रकार आढळून आले आहेत. एक्स (आधीचे ट्विटर), फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप, टिकटॉक आदींच्या सततच्या वापरामुळे लोकांना कृत्रिम विश्वात जगण्याची सवय लागली आहे. 24 तास स्मार्ट फोन व समाजमाध्यमांच्या विश्वात राहिल्याने मेमरीवर परिणाम, सतत लक्ष विचलित होणे, साध्या साध्या गोष्टीही फोन शिवाय न जमणे अशी लक्षणे आता अनेकांत दिसू लागली आहेत. फेसबुक वापरणे पूर्णपणे बंद केल्यावर 85टक्के लोकांनी आपण आनंदी झाल्याचे लिहिले आहे. स्मार्ट फोन आणि समाजमाध्यमांच्या अतिवापराच्या व्यसनापासून मुक्ती मिळावी म्हणून शिबीरेही आयोजीत होऊ लागली आहेत. तर अशा या स्मार्ट फोन आणि समजमाध्यमांच्या मायावी दुनियेमुळे आपण किती मूर्ख व्हायचे व स्मार्ट आजारांना निमंत्रण किती द्यायचे हे आता वापरणाऱ्यांनीच ठरवायचे.
डिजिटल डिटॉक्स कसे करावे?
दिवसातून काही तास फोन आणि इतर डिजिटल डिव्हाइस वापरणार नाही, असं ठरवा. त्या काळात फोनमधील नोटिफिकेशन्स बंद करा. रात्री झोपेच्या आधी क्रीन वापरणे कमी करा. जर तुम्हाला रात्री मेल, व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडिया तपासण्याची गरज असेल तर फक्त 15 मिनिटे त्यासाठी ठेवा. झोपण्याच्या किमान एक ते दीड तास आधी सगळ्या डिजिटल उपकरणांपासून दूर राहा. डिजिटल डिटॉक्समध्ये थोड्या वेळासाठी तुमचा फोन आणि लॅपटॉपचा वापर न केल्यास तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहते. डिजिटल डिटॉक्सचा अर्थ असा नाही की तुम्ही फोन वापरणे थांबवावे. कारण फोनशिवाय तुमची बरीच कामे थांबतील. तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप फक्त गरज असेल तेव्हाच वापरावा व काही वेळेसाठी तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद करा आणि काही वेळ एकटे किंवा कुटुंब किंवा मित्रांसोबत घालवावा. असे केल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते व तुमचा मेंदूही अधिक तीक्ष्ण काम करतो.
सुरुवातीला तुम्हाला फोनपासून लांब असल्यामुळे कंटाळा येईल. पण तुमच्या आजूबाजूच्या काही गोष्टींमध्ये तुम्ही मन रमवू शकता. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवा. घरातली काही कामे करा. थोडा वेळ फिरायला जा. पुस्तके वाचा. गाणं म्हणा. पोहायला जा. चित्र काढा किंवा क्राफ्टिंग करा. तुमचे छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. चांगल्या मानसिक आरोग्यासाठी गाढ झोप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही दिवसभर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत राहता तेव्हा त्याचा पहिला परिणाम तुमच्या झोपेवर होतो. स्मार्टफोन आणि इतर क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश झोपेला नियंत्रित करणाऱ्या ‘मेलाटोनिन’ हार्मोनच्या निर्मितीत अडथळा आणतो. झोपण्यापूर्वी फोन, लॅपटॉप आणि टीव्हीपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करावा. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन, ईमेल आणि सोशल मीडियाच्या अपडेट्समुळे मेंदूवर अतिरिक्त ताण येतो. डिजिटल डिटॉक्स केल्याने या सततच्या माहितीच्या प्रवाहापासून मुक्ती मिळते. यामुळे मनाला शांतता मिळते, ताण कमी होतो आणि चिंता कमी होते. ईश्वरी राज्य ही संकल्पना आपल्याला आठवण करुन देते की राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नसून लोकसेवा आणि सत्यनिष्ठेचे व्रत आहे. जर शासनकर्ता मूल्याधिष्ठित असेल आणि नागरिकही कर्तव्य, प्रामाणिकपणा व शिस्त पाळतील तरच रामराज्याचे स्वप्न साकार होऊ शकते. समाजातील मतभेद, विद्वेष आणि भ्रष्टाचार दूर करुन सत्य, न्याय व नैतिकतेवर आधारित प्रशासन उभे करणे हीच रामराज्याची खरी शिकवण आहे. ईश्वरी राज्याची ही दिव्य संकल्पना आजच्या काळात अधिक आवश्यक आहे कारण तीच मानवजातीला शांतता, समता आणि कल्याणाचा मार्ग दाखवते.
प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर