वाहनांच्या कागदपत्राची डीजिटल कॉपी ग्राह्य
कोल्हापूर :
वाहन मालक किंवा चालक यांनी वाहन नोंदणीप्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पी.यु.सी. अशी महत्वाची कागदपत्रांची डिजी लॉकर किंवा एमपरिवहन मोबाईल अॅपवरील डिजीटल कॉपी दाखवल्यास ती ग्राह्या धरावी, असे आदेश मुंबई पोलीस सह्याक आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभार यांनी काढले आहेत.
या आदेशामध्ये म्हटले आहे. वाहनधारक किंवा चालक यांनी त्यांचे डिजी लॉकर अॅपमधील त्यांना जारी करण्यात आलेले अनुज्ञप्ती, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहनाचा विमा, पी.यु.सी. यांची डिजीटल कॉपी दाखवून सुध्दा त्यांच्यावर वाहतुक शाखेची पोलिस ई-चलान करीत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांनी वाहन चालक अनुज्ञप्ती आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रांची डिजीटल कॉपी डिजी लॉकर व एमपरिवहन या मोबाईल अॅपद्वारे दाखविण्याची सुविधा वाहनधारकांना उपलब्ध करून दिली आहे. एखाद्ये कागदपत्र डिजीटली स्वाक्षरी. केली असता ते मुळ प्रत ठेवण्यासमान आहे, असे नमूद आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी वाहनधारकांने डिजी लॉकर व एमपरिवहन मोबाईल अॅपद्वारे कागदपत्रे दाखविल्यास ती ग्राह्य धरण्यात यावीत, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलीस सहाय्यक आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभार यांनी दिले आहेत.