प्रेमविवाह केल्याने भाचीच्या लग्नाच्या जेवणात मामाने कालविले विष
कोल्हापूर
भाचीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून लग्नाच्या स्वागत समारंभातील भोजनात विष कालविल्याचा प्रकार आज उघड झाले आहे.
याप्रकरणी पन्हाळा पोलिसांत संबंधित नववधूच्या मामाविरोधत अन्न व सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. हा प्रकार तालुक्यातील उत्रे येथे हा घडला. नवरदेवाच्या काकांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाचीने प्रेमविवाह केला. तिचा स्वागत समारंभ उत्रे येथील एका कार्यालयात आयोजित केला होता. स्वागत समारंभाची लगबग सुरू होती. या कार्यक्रमाला पाहुणेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांसाठी भोजनाची व्यवस्था चोख करण्यात आली होती.
उत्रे इथं लहानपणापासून भाची महेश पाटील यांच्याकडे होती राहायला. दरम्यान उत्रे गावातील एका तरूणाशी तिचे प्रेमसुत जुळले. मामाचा लग्नाला विरोध असल्याने भाचीने आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर नवऱ्या मुलांकडील मंडळींनी मंगळवारी गावातील एका हॅालमध्ये लग्नाच्या स्वागत सभारंभाचं आयोजन केलं होतं. तसचं लग्नानंतर उत्रे गावात नवरदेवाच्या कुटुंबीयांकडून फटाक्यांची आतषबाजी झाल्याने मामाच्या संतापात भर पडली.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, महेश पाटील च्या भाचीने एक आठवड्यापूर्वी गावातील मुलासोबत प्रेम प्रकरणातून पळून जाऊन विवाह केला होता. घरच्यांचा विरोध जुगारून लग्न केल्याने मामाच्या मनात प्रचंड रोष होता. त्यामुळे मामा महेश पाटील ने भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या जेवणात विषारी औषध टाकले. दरम्यान मामाला औषध टाकत असताना तेथील आचारीने पाहिले आणि अनर्थ टळला. आचारीने मामाला अडवण्यासाठी गेला आणि दोघांमध्ये झटापट देखील झाली. आचारीने जेवणात विष असल्याचं सगळ्यांना सांगितल्यानंतर जेवण बाजूला ठेवण्यात आले. या प्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक तपास कोंडुभैरी तपास करीत आहेत.