24 तास पाणीपुरवठ्यासाठी खोदाईला चालना
11:25 AM Oct 17, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : 24 तास पाणी पुरवठ्यासाठी एलअँडटीकडून प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी वॉर्ड क्र. 10 मध्ये मुजावर गल्लीत 24 तास पाणीपुरवठा जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. एलअँडटी कंपनीचे अधिकारी व सिद्धार्थ भातकांडे यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 9 ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येत आहेत. या माध्यमातून शहराला 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याबरोबर जलवाहिन्या घातल्या जात आहेत. मुजावर गल्ली येथे रस्ता करण्यापूर्वीच जलवाहिनी घालण्यात यावी, याबाबत मनपा बैठकीत चर्चा झाली होती. त्यानुसार रस्ता करण्यापूर्वीच जलवाहिनी घालण्यासाठी खोदाई करण्यात येत आहे. या कामाला बुधवारी चालना देण्यात आली. यावेळी एलअँडटी कंपनीचे विजयानंद सोलापूर, चंद्रबोस रविचंद्रन यासह नागरिक उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article