महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दिगंबरनीच काँग्रेसला रसातळाला नेले!

12:12 PM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांचा आरोप : राज्यात काँग्रेस पक्ष संघटना संपवल्याचाही दावा

Advertisement

वास्को : माजी मुख्यमंत्री व भाजपाचे विद्यमान आमदार दिगंबर कामत यांनीच गोव्यात काँग्रेस पक्षाला रसातळाला नेला. त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्षावर आज दयनीय अवस्था ओढवलेली असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी केला आहे. साल 2007 मध्ये रवी नाईकांना मुख्यमंत्री बनवले असते तर काँग्रेस पक्ष संघटना आजही मजबूत राहिली असती. दिगंबर कामतांना मुख्यमंत्रीपद आणि विरोधी पक्ष नेतेपद देऊन पक्षाने गंभीर चूक केली होती, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते गिरीष चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक प्रचारानिमित्त पंजाबचा दौरा करून मंगळवारी दुपारी गोव्यात दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या चोडणकर यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना आमदार दिगंबर कामत यांच्यावर तोफ डागली.

Advertisement

रवी नाईक यांचा होता अधिकार

दिगबंर कामत यांनीच गोव्यात काँग्रेस पक्षाचा सत्यानाश केला असे जळजळीत उद्गार त्यांनी काढले. 2005 मध्ये ते भाजपाला सोडून काँग्रेसमध्ये आले. त्यांना मंत्रीपद मिळाले. 2007 मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. खरे तर बहुजन समाजाचे नेते रवी नाईक यांचा मुख्यमंत्रीपदावर अधिकार होता, असे चोडणकर म्हणाले. दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे 23 आमदार होते, ती संख्या 9 पर्यंत खाली आली, त्यालाही दिगंबर कामतच जबाबदार आहेत. काँग्रेसची सध्या जी दयनीय अवस्था झाली आहे, तिला कामत हेच जबाबदार आहेत, असे चोडणकर ठामपणे म्हणाले.

मनमानीच केली, पक्षबांधणी नाही

त्यानंतर 2012 मध्ये त्यांनाच पक्षाच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते बनवले. या काळात त्यांनी मनमानीच केली. कामत हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. त्यांनी कधी पक्षबांधणी केली नाही.

कामतांनी स्वत:चे विचार लादले

सुभाष शिरोडकर यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या काळात आणि आपल्या अध्यक्षपदाच्या काळातसुध्दा त्यांनी स्वत:चे विचार लादण्याचा प्रयत्न केला. पक्ष बांधणीकडे दुर्लक्षच केले. माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनीसुध्दा त्यांना साहाय्यच केले. मात्र, त्यांनी पक्षाला दगाच दिला.

काँग्रेस पक्षाशी केली गद्दारी

साल 2017 मध्ये बहुसंख्य आमदार निवडून आले तरीही राज्यात काँग्रेसचे सरकार आले नाही, यालाही दिगंबर कामतच जबाबदार होते. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते. काँग्रेसमध्ये असतानासुध्दा आपले भाजपाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते असे आमदार दिगंबर कामत यांनी नुकतेच म्हटलेले आहे. त्यामुळे ते काँग्रेस पक्षाशी किती गद्दारी करीत होते हे स्पष्ट होते असे गिरीष चोडणकर म्हणाले. दिगंबर कामत यांनी काँग्रेस पक्ष संघटना संपवली. त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बनवले ही चूक होती. रवी नाईक मुख्यमंत्री बनले असते तर काँग्रेस पक्षावर आजच्यासारखी परिस्थिती ओढवली नसती, असे चोडणकर म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article