महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘अद्भूत’मध्ये डायना पेंटी

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Advertisement

भयपट ‘अद्भूत’मध्ये  नवाजुद्दीन सिद्दीकी आणि डायना पेंटी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात नवाजुद्दीन आणि डायनासोबत शशांक शेंडे, श्रेया धन्वंतरी आणि रोहन मेहरा दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सब्बीर खानने केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर तसेच पोस्टर अभिनेत्री डायनाकडून शेअर करण्यात आला आहे. याच्या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन काहीतरी विचार करताना तर पार्श्वभूमीत एका युवतीची सावली दिसून येते. यंदाचा सर्वात चकित करणाऱ्या चित्रपटांपैकी एक अदभूत. हा चित्रपट सोनी मॅक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. 15 सप्टेंबर रोजी हा चित्रपट पाहता येईल असे डायनाने नमूद केले आहे. भूत-प्रेत किंवा अलौकिक शक्तींवर विश्वास न ठेवणाऱ्या युवतीची भूमिका डायना यात साकारत आहे. आपल्यासोबत काहीतरी अजब घडतंय अस वाटू लागल्यावर ही युवती मदतीसाठी एका तज्ञाकडे जात असल्याचे दाखविण्यात येणार आहे. अदभूत हा बॉलिवूडचा सुपरनॅचरल थ्रिलर ड्रामापट आहे. या चित्रपटाची निर्मिती सोनी पिक्चर्स इंडियाकडून करण्यात आली असून याचे चित्रिकरण मुंबईतील स्टुडिओत पार पडले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article