दीया मिर्झाकडून चित्रिकरण पूर्ण
खड्डे युक्त घरांमध्ये लोकांचे वास्तव्य
चीनच्या उत्तर हिस्स्यात एक असे गाव आहे, जे जमिनीच्या वर नव्हे तर खाली वसलेले आहे. हेनान प्रांताच्या बेइयिंग गावात लोक खड्डयांसारख्या घरांमध्ये राहतात, ज्यांना मंदारिनमध्ये ‘डिकेंगयुआन’ म्हटले जाते. याचा अर्थ पिट कोर्टयार्ड्स असा होतो, हा काही नवा शोध नाही, तर सुमारे 7 हजार वर्षे जुनी परंपरा आहे.
लोएस प्लेटोच्या मातीत खोदलेली ही घरं नैसर्गिक एसी-हीटर आहेत. ही घरं उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात उबदार असतात. याचबरोबर भूकंपातही ही घरं सुरक्षित राहतात. या भागात जमिनीच्या आत असलेली अनेक घरे आहेत. पूर्वी सर्व घरांमध्ये लोक राहत होते. परंतु आता अनेक खाली होत आहेत. आता त्यांना टूरिस्ट्स स्पॉट्समध्ये बदलण्यात आले आहे.
जमिनीच्या आत निर्मित या घरांचे दृश्य हैराण करणार आहे. बाहेरून हे एखाद्या खड्डयांप्रमाणे वाटते. परंतु याच्या आतील दृश्य अत्यंत वेगळे आहे. घरात तुम्हाला किचन, बेडरुम, ड्रॉइंग रुम आणि ओपन कोर्टयार्ड्स देखील दिसून येते. परंतु आता बहुतांश घरांचे नुतनीकरण करत पर्यटनस्थळ करण्यात आले आहे. काही घरांमध्ये आजही लोक राहतात, या अनोख्या जीवनशैलीला पाहून लोक दंग होतात. अनेकांनुसार हे फ्यूचर ऑफ सस्टेनेबल लिव्हिंगचे उदाहरण आहे. ही घरं लोएस प्लेटोवर निर्मित आहेत, जो चीनच्या उत्तर हिस्स्यात फैलावलेला आहे. याची माती अत्यंत नरम परंतु मजबूत असते. तसेच अत्यंत सहजपणे यात खोदकाम करता येते.
घरनिर्मिती अत्यंत सोपी
या घरांच्या निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. जमिनीत 6-7 मीटर खोल ख•ा तयार केला जातो. त्यानंतर याच्या चहुबाजूला भिंती तयार केल्या जातात, आत रुम्स निर्माण करण्यात येतात. वरून सूर्यप्रकाश येतो आणि हवेचा प्रवाह खेळता राहतो. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे रिसर्च फेलो लिम ताई वेई यांच्यानुसार अकॅडमिक लिटरेचरमध्ये याचा उल्लेख 7 हजार वर्षे जुना आहे. हे फोक हाउस असून ते या भागातील नैसर्गिक संरचनेशी सुसंगत आहेत. हे याओडोंग म्हणवून घेणाऱ्या केव ड्वेलिंग्सचा प्रकार असून जे चीनमध्ये साधारण मानले जाते. पूर्वी लाखो लोक असे राहत होते, परंतु आता आधुनिकतेने याची संख्या कमी केली आहे. बेइयिंग गावात शेकडो अशी घरं असून एका घरात 4-5 रुम्स असतात. भिंती मातीच्या असतात, परंतु मजबूत असतात, हिवाळ्यात माती उष्णता संग्रहित करते, तर उन्हाळ्यात शीतलता प्रदान करते.