धोनी दिल्लीकडे रवाना
वृत्तसंस्था / चेन्नई
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एम. एस. धोनी मंगळवारी दिल्लीकडे रवाना झाला. आयपीएलच्या इतिहासामध्ये चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत पाचवेळा अजिंक्यपद मिळविले आहे. आता यावेळी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ सहाव्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे.
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार चेन्नई सुपर किंग्जचा सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि आतापर्यंत पाचवेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सबरोबर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनीने आयपीएल क्रिकेट स्पर्धेतही सातत्याने दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाला पाचवेळा जेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रांचायझीनी धोनीला 4 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे.