उडुपीचा धीरजकुमार मि.कर्नाटकाचा मानकरी
उडुपी जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे आयोजन : उडुपीचा चरणराज उपविजेता, धारवाडच्या झखीर हुल्लूरला उत्कृष्ट पोझरचा बहुमान
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना, ई-फिटनेस व्यायामशाळा व उडुपी जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मि. कर्नाटका राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उडपीच्या धिरजकुमारने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मिस्टर कर्नाटका हा मानाचा किताब पटकाविला तर उडपीच्या चरणराजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उकृष्ट पोझरचा बहुमान धारवाडच्या झखीर हुल्लूरने मिळविला.
आयबीबीएफ मुंबईच्या मान्यतेनुसार 7 वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली असून या स्पर्धेत जवळपास संपूर्ण राज्यातून 150 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढील प्रमाणे....
55 किलो वजन गट : 1) संदेशकुमार-उडपी, 2) कृष्णप्रसाद-उडपी, 3) गोविंद-उडपी, 4) विजय जडागौडर-धारवाड, 5) यशवंत-कारवार
60 किलो वजन गट : 1) अभिलाश-उडपी, 2) शशिधर नाईक-उडपी, 3) झकीर हुल्लूर-धारवाड, 4) विशाल निलजकर-बेळगाव, 5) ऋषभ वशिष्ट-रायचूर
65 किलो वजन गट : 1) धिरज-उडपी, 2) आकाश आर.-शिमोगा, 3) सोमशेखर कारवी-उडपी, 4) मंजुनाथ बी.-चित्रदुर्ग, 5) वरधराज-उडपी
70 किलो वजन गट : 1) लोकेश पाटील-शिमोगा, 2) प्रताप कालकुंद्रीकर-बेळगाव, 3) व्यंकटेश ताशिलदार-बेळगाव, 4) कुमार-उडपी, 5) मंजुनाथ कोल्हापुरे-
बेळगाव
75 किलो वजन गट : 1) दिनेश आचार्य-मंगळूर, 2) वरुणकुमार जिविके-दावणगिरी, 3) सुनील भातकांडे-बेळगाव, 4) गौतम-बेंगळूर, 5) राम खुशी-दावणगिरी
80 किलो वजन गट : 1) पवन-उडपी, 2) हेमंतकुमार-शिमोगा, 3) राहुल मिहीरवाडे-दावणगिरी, 4) राहुल कलाल-बेळगाव, 5) सत्यानंद भट्ट-म्हैसूर
85 किलो वजन गट : 1) अंश सिंग-बेंगळूर, 2) किरण सी.-चिक्कमंगळूर, 3) तेजस-उडपी, 4) सुप्रम शेट्टी-कारवार
85 किलो वजन गटावरील : 1) चरणराज-उडपी, 2) नजिबुल्ला खान-म्हैसूर, 3) व्ही.बी. किरण-बेळगाव, 4) मोहम्मद नुरल्ला, 5) श्रीनिवास एम.-बेंगळूर यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.
मि. कर्नाटकासाठी संदेशकुमार, अभिलाश, धिरज, लोकेश पाटील, दिनेश आचार्य, पवन, अंश सिंग, चरणराज यांच्यात लढत झाली. त्यामध्ये चरणराज व धिरजकुमार यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर धिरजकुमारने मि. कर्नाटका हा मानाचा किताब पटकाविला. तर उडपीच्या चरणराजने पहिले उपविजेते पटकाविले. धारवाडच्या झकीर हुल्लूरने उकृष्ट पोझरचा मान मिळविला. या स्पर्धेसाठी कर्नाटका शरीरसौष्ठव संघटनेच्या पंचांनी चोख कामगिरी बजावली.