For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

धर्मवीर ज्वाला आज बेळगावात

11:14 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
धर्मवीर ज्वाला आज बेळगावात

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने बुधवारी शेकडो धारकरी धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी वढू बुद्रुक येथे रवाना झाले. सांगली येथून प्रज्वलित केलेली ज्वाला बेळगावमध्ये आणली जाणार आहे. गुरुवार दि. 4 रोजी सकाळी 7 वाजता धर्मवीर ज्वाला धर्मवीर संभाजी चौक येथे दर्शनासाठी ठेवली जाणार आहे. ट्रक तसेच इतर वाहनांनी शेकडो धारकरी वढू बुद्रुकच्या दिशेने रवाना झाले. गुरुवारी शंभूतीर्थ येथे धर्मवीर ज्वालेचे स्वागत केले जाणार असून त्यानंतर दर्शनासाठी ज्वाला ठेवली जाणार आहे. यावेळी शिवप्रतिष्ठानचे प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, हिरामणी मुचंडीकर यांच्यासह धारकरी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.