कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धर्मा, डायनामिक, रॉयल पाटील, शेट्टी किंग्ज विजयी

11:01 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : श्री पद्मावती स्पोर्ट्स क्लब आयोजित जैन समाज मर्यादित पहिल्या पद्मावती प्रीमियर लीग प्रकाशझोतातील डे नाईट टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात धर्मा एके संघाने गऊडा स्मॅशरचा, डायनामिक किंग्ज संघाने जनसेन माता संघाचा,शेट्टी किंग्जने जैन किंग्सचा तर रॉयल पाटील संघाने एस के वॉरियर संघाचा पराभव करून विजयी सलामी दिल.ि प्रणित, अक्षय, पवन, प्रवीण शेरी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

युनियन जिमखाना मैदानावरती सुरू झालेल्या पद्मावती प्रीमियर लीग स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धर्मा एके संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी बाद 96 धावा केल्या. शिवकुमार पद्मान्नवरने 37, आदित्यने 18, वर्धन पाटीलने 12 धावा केला. गऊड स्मॅशरतर्फे मृणाल व प्रवीण यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यानंतर गऊडा सॅमशरने 10 षटकात 6 गडी बाद 73 धावा केल्या. तुषार चौगुलेने 18, सुमित आप्पाण्णरने 13, तर अजिंक्मय ने 10 धावा केल्या. धर्मातर्फे दर्शनने दोन तर तुषार व अक्षित याने प्रत्येकी एक गडी बाद केला.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात जनसेन माता नंदिनी संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी बाद 86 धावा केल्या. अभिनयने 27, विद्यासागरने 25, अमोलने 20 धावा केल्या. डायनामिक किंग्जतर्फे प्रणितने तीन, विशाल, सिद्धार्थ, आदित यांनी प्रत्येक 1 गडी बाद केला. त्यानंतर डायनामिक किंग्ज 7.2 षटकात तीन गडी बाद 89 धावा करत सामना सात गड्यांनी जिंकला. त्यात अक्षयने 49, किरणने 22, राहुलने 15 धावा केल्या. जनसेन मातातर्फे भूषण, सागर याने प्रत्येकी एक गडी बाद केला.

तिसऱ्या सामन्यात एस. के. वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 9.1 षटकात सर्व गडीबाद 83 धावा केल्या. अमितने 21, बाबूने 17 धावा केल्या. रॉयल पाटील तर्फे अक्षय पत्रावळी व पवन यांनी प्रत्येकी 3, तर पुऊषोत्तम, अक्षय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉयल पाटील संघाने 8.3 षटकात पाच गडी बाद 84 धावा करून सामना पाच गड्यांनी जिंकला. प्रज्वलने 31, अर्पितने 29 धावा केल्या. सर्वे निखिल, अधिराज व शितल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

चौथ्या सामन्यात शेट्टी किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 3 गडी बाद 109 धावा केल्या. प्रवीण शेरीने 55, मृणाल पाटीलने 32 धावा केल्या. त्यानतंर जैन किंग्जने 10 षटकांत 2 गडी बाद 100 धावा केल्या. नरसगौडा व वारदराज यांनी प्रत्येकी 31 तर अभिनंदने 12, शांतने 10 धावा केल्या. शेट्टीतर्फे मृणाल व प्रवीण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article