For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रीतिसोबत झळकणार धनुष

06:21 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रीतिसोबत झळकणार धनुष
Advertisement

आनंद एल. राय यांच्या चित्रपटात वर्णी

Advertisement

दक्षिणेतील सुपरस्टार धनुष्य स्वत:चा आगामी चित्रपट ‘कुबेर’मुळे सध्या चर्चेत आहे. तर आता अभिनेता लवकरच एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत काम करणार आहे. अभिनेत्री क्रीति सेनॉन आणि धनुष लवकरच एका चित्रपटात दिसून येणार ओत.

2013 मध्ये ‘रांझणा’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक आनंद एल. राय आणि अभिनेता धनुष पुन्हा एकदा ‘तेरे इश्क में’ नाव असलेल्या रोमँटिक चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. या संगीतमय प्रेमकहाणीत मुख्य नायिका म्हणून क्रीति सेनॉन काम करणार आहे. या चित्रपटाला ए. आर. रहमान यांचे संगीत लाभणार आहे. तर याची कहाणी इरशाद कामिल यांची असणार आहे. क्रीति सेनॉनने या चित्रपटात काम करण्यासाठी होकार दर्शविला आहे.

Advertisement

या चित्रपटाचे चित्रिकरण ऑक्टोबर महिन्यात सुरु होऊ शकते. तर हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. क्रीति सेनॉनचा ‘दो पत्ती’ हा चित्रट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तर धनुष आगामी काळात ‘कुबेर’ या चित्रपटात रश्मिका मंदानासोबत दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :

.