कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2 ऑक्टोबर रोजी कट्टा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम

01:24 PM Sep 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण वार्ताहर

Advertisement

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण व महिला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजया दशमी व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10:30 वाजता धम्म ध्वजारोहण, 10:45 वाजता धम्म वंदना, 11 वाजता जाहीर सभा व सेवानिवृत्त आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष रविकांत कदम असणार आहेत तर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून इचलकरंजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर, जिल्हा कोषाध्यक्ष शिवप्रसाद चौकेकर, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, प्राध्यापक डॉ. नंदू हेदुळकर, महिला जिल्हाध्यक्ष सुषमा हरकुळकर, महिला सरचिटणीस अपूर्वा पवार, माजी जिल्हाध्यक्ष एम.आर. डांगोमोडेकर, जेष्ठ कार्यकर्ते व्ही. टी. जंगम माजी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम आधी उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती महिला संस्कार उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर, महिला संरक्षण उपाध्यक्ष प्रीतम जाधव, महिला तालुकाध्यक्ष नेहा काळसेकर, महिला सरचिटणीस समता डिकवलकर, जिल्हा महिला संघटक लीना तळगावकर यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास मालवण तालुक्यातील धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका सरचिटणीस प्रकाश पवार, कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम, तालुका संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article