For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

धाराशिव येथे कलेक्टर कचेरीवर मेंढरासह धडक मोर्चा! एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करण्याची मागणी

07:36 PM Nov 30, 2023 IST | Abhijeet Khandekar
धाराशिव येथे कलेक्टर कचेरीवर मेंढरासह धडक मोर्चा  एस टी आरक्षण अंमलबजावणी करण्याची मागणी

धाराशिव : वार्ताहर

धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने एसटी आरक्षणासाठी गुरुवार दि.(30) रोजी जिल्हाधिकारी कार्याल्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षण अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

Advertisement

आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेलं पिवळ वादळाची लेडीज क्लब येथून मोर्चाची सुरूवात झाली. हा भव्य मोर्चा संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लहुजी वस्ताद साळवे चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.धनगर समाजातील अहिल्या देवींच्या वारसा असलेल्या मुलींच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चासाठी धाराशिव जिल्ह्यातील धनगर समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी धनगर समाजातील अनेक वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भव्य मोर्चात मेंढरे,धनगरी ढोल,भांडाऱ्याची उधळण करत मोर्च्याची सुरवात करण्यात आली. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, यांसह घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला. धनगर आरक्षणाचा मुद्दा निकालात काढण्याची मागणी धनगर समाजाने केली आहे. अन्यथा धनगर समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा धनगर समाजाच्यावतीने देण्यात आला.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.