For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीजीपी सिंग यांची बदली लवकरच

12:52 PM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
डीजीपी सिंग यांची बदली लवकरच
Advertisement

गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर दिल्लीला रवाना : आगरवाडेकर कुटुंबाचे घर पाडण्यात आले नाव

Advertisement

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्याचे प्रकरण पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांना बरेच डोईजड होत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातून आलेल्या आदेशानंतर काल बुधवारी त्यांना दिल्लीला धाव घ्यावी लागली आहे. गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर तात्काळ रजा काढत ते दिल्लीला रवाना झाले आहेत.आगरवाडेकर यांचे घर पाडण्याच्या प्रकरणाने गेले आठ ते दहा दिवस राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

या प्रकरणात महासंचालक सिंग यांचाच हात असल्याचा आरोप होत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. त्यांची पोलीस महासंचालक पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणीही राजकीय वर्तुळातून केली जात असल्याने सरकारवर दबाव आला आहे. सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतल्याने सिंग यांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.गृहमंत्रालयाने राज्याकडून आगरवाडेकर प्रकरणाचा अहवाल मागितल्यानंतर आता महासंचालक जसपाल सिंग यांना दिल्ली बोलावून घेतल्याने त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होते,

Advertisement

याकडे राज्यातील जनतेच्या नजरा लागलेल्या आहेत. गृहमंत्रालयाने जसपाल सिंग यांची चौकशी करण्यास सुरुवात केल्याने त्यांच्या जागी आता नवीन महासंचालक येण्याची शक्यता आहे. आगवाडेकर कुटुंबियांनी पूजा शर्मा हिच्याविऊद्ध तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न केला असला तरी हे प्रकरण खूप वरपर्यंत पोहचल्याने आणि संशयाची सुई पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत गेल्याने त्यांची बदली होणार नाही.

विरोधकांनी रान उठवले

आगरवाडेकर कुटुंबियांचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळून समस्त गोमंतकीयांमध्ये आगरवाडेकर कुटुंबियांविषयी सहानुभूती निर्माण झाली होती. विरोधकांनी तर रान उठवून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. स्वत: मुख्यमंत्री सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने हे प्रकरण महासंचालकांविऊद्ध कारवाईपर्यंत पोहचलेले आहे. काँग्रेसचे आमदार कार्लोस फेरेरा यांनीही पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांना तात्काळ पदावरून हटविण्याची मागणी केली आहे.

Advertisement
Tags :

.