देवसू- ओवळीये रस्ता डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ
वाहन चालकांसह या दोन्ही गावातील ग्रामस्थांमधून समाधान
ओटवणे |प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे पुन: डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या देवसू- ओवळीये या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी भाजप व शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वाहन चालकांसह या दोन्ही गावातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, गजानन नाटेकर, निता सावंत, देवसू सरपंच रुपेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य शांताराम सावंत, ओवळीये सरपंच तारामती नाईक, उपसरपंच मनस्वी सावंत, माजी सरपंच अब्जू सावंत, श्वेता सावंत कोमल दळवी, प्रिया सावंत, अजीत सावंत, भाजपचे आंबोली मंडळ उपाध्यक्ष अमोल सावंत, बुथ अध्यक्ष अशोक सावंत, पारपोली बूथ अध्यक्ष मनीष परब, ओवळीये बुथ अध्यक्ष सागर सावंत, सामाजिक कार्यकर्ते तारकेश सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष समीर शिंदे, भाजप कार्यकर्ते वाय डी सावंत, अरुण देसाई, हनुमंत सावंत, जगन्नाथ सावंत आदी उपस्थित होते.