दहा फुटी अजगराला सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी केले जेरबंद
ओटवणे । प्रतिनिधी
सावंतवाडी बांदा नाका परिसरात भर वस्तीत मुक्त संचार करणाऱ्या दहा फुटी महाकाय अजगराला सर्पमित्राने मोठ्या शिताफिने जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यामुळे भीतीने गाळण उडालेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.शहरातील बांदा नाका परिसरात भरवस्तीत हा दहा फुटी महाकाय अजगर ग्रामस्थांच्या दृष्टीस पडला. या महाकाय अजगरामुळे सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. त्यानंतर सर्पमित्र नाविद हेरेकर यांना तात्काळ घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर सर्पमित्र नविद हेरेकर यानी त्यांचा विद्यार्थी पियुष निर्गुण याच्या सहकार्याने या महाकाय अजगराला जेरबंद केले. हा महाकाय अजगर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मादी जातीचा हा अजगर होता. त्यानंतर नाविद हेरेकर यांनी या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले. सर्पमित्र नविद हेरेकर यांनी यापूर्वीही सावंतवाडी परिसरातील अनेक अजगरांसह सापांना जीवदान देत त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. नविद हेरेकर हे आपल्या हेरेकर क्लासिसच्या माध्यमातून मुलांचे केवळ शैक्षणिक नाही तर सामाजिक विकास देखील करत आहेत.