शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यल्लम्मा डोंगरावर भाविकांची गर्दी
सुमारे चारशेहून अधिक बसेसमुळे डेंगरावर लांबचलांब वाहनांच्या रांगा : देवदासी प्रथा प्रतिबंधबाबत डेंगरावर जनजागृती
वार्ताहर /बाळेकुंद्री
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीची शाकंभरी पौर्णिमेनिमित्त यात्रा आज होणार आहे. यात्रेfिनमित्त लाखो भाविकांचे आगमन होत आहे. बुधवारी पहाटेपासूनच मोठ्या संख्येने भाविक येत असून पदयात्रेनेही डोंगरावर येत आहेत. यामुळे संपूर्ण यल्लम्मा डोंगर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास देवीच्या मंदिरापासून 3 कि. मी. पर्यंत डोंगराच्या चढतीवर तिन्ही मार्गांवरून येणाऱ्या कार, रिक्षा, टॅक्टर, मोटारसायकल व कर्नाटक, महाराष्ट्राच्या सुमारे चारशेहून अधिक बसेसचा ताफा डोंगरावर आल्याने डेंगरावर लांबचलांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
पथनाट्याद्वरे जगृती
महिला व बाल कल्याण विकास विभाग आणि देवदासी प्रतिबंध कायदा 2009 नुसार कोणत्याची महिलेला शारीरिक शोषण करणे, बळजबरीने कोणालाही देवदासी बनविणे हे कायद्याच्या विरोधात असल्याचे कलाकारांनी पथनाट्याद्वारे डोंगरावर आलेल्या नागरिकांसमोर सादरीकरण करून जागृती केली. यावेळी बालविकास अधिकारी सुनीता पाटील, देवदासी पुनर्वसन जिल्हा योजना अधिकारी सुवर्णा गौडर, भरत कलाचन्द्र उपस्थित होते.