धबधब्याच्या आड ‘सैतानाची गुहा’
वेगळ्या जगाची होते अनुभूती
फिलिपाईन्सचा पगसंजन धबधबा रोमांच इच्छिणाऱ्या लोकांसाठी जणू स्वर्गच मानला जातो. या धबधब्यामागे एक मोठी गुहा असून तिला ‘सैतानाची गुहा’ या नावाने ओळखले जाते. या गुहेत गेल्यावर लोकांना वेगळ्याच जगाची अनुभूती होत असते. तसेच येथे फिरण्यासाठी आलेल्या लोकांना जबरदस्त बोटिंगचा अनुभव देखील मिळतो.
पर्यटक या कोसळणाऱ्या धबधब्यात भिजून या गुहेच्या आत पोहोचतात, याकरता त्यांना नौकेतून प्रवास करावा लागतो. यादरम्यान लोकांना विशेष सुरक्षा हेल्मेट परिधान करण्यासाठी दिले जाते. या गुहेचे स्वरुप सैतानाच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते असल्याने याला सैतानाची गुहा असे नाव मिळाले आहे. ही गुहा अंधाराने भरलेली असून येथे पर्यटक कंबरेइतक्या खोल पाण्यात पोहोचण्याचा आनंद घेऊ शकतात.
पगसंजन धबधब्याच्या परिसरात लोकांना बोटिंगचा आनंद घेता येतो. धबधब्यापर्यत एक नदीतून प्रवास करत पोहोचता येते, याला स्थानिक स्वरुपात ‘शूटिंग द रॅपिड्स’ या नावाने ओळखले जाते. पगसंजन फॉल्स ज्याला कॅविटी फॉल्स आणि मॅग्डापियो फॉल्स असेही नाव असून तो लगुना प्रांतात आहे. या धबधब्याचे रुपांतर पुढे बुम्बुंगन नदीत हेत असते.