सरकार-फडणवीस युती धक्का देणारी, पालकमंत्री देसाईंना घेरण्याची रणनीती?
सातारा जिल्ह्याची डेमोग्राफी आणि पॉलिटोग्राफी बदलणार?
By : दीपक प्रभावळकर
सातारा : राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये नेत्यांनी केलेला पक्षबदल कोणालाच नवीन नाही. उदयनराजेंनी पक्ष बदलले तरी अनेकांना ते अपेक्षित होते. कोणतीही निवडणूक किंवा अराजक नसताना पाटण इलाक्याचे सरदार सत्यजितसिंह पाटणकर हे छत्रपती उदयनराजेंचा पक्ष असलेल्या पक्षामध्ये सहभागी होत आहेत. आणि तेही फडणवीस यांच्या साक्षीने.
आजवर आमदारही नसलेले सत्यजित भाजपामध्ये आल्यामुळे सातारा जिल्ह्याची डेमोग्राफी आणि पॉलिटोग्राफी बदलणार आहे. कालपरवापर्यंत एकाधिकार असणाऱ्या शंभूराजेंना किमान तीन बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न होतोय. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील राजकीय घडामोडींनंतर केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार जेमतेम असले तरी राज्यात फडणवीसांचे सरकार डबल भक्कम झालंय.
अशा परिस्थितीत फडणवीसांना राज्य पूर्णतः एकतर्फी करण्याचा मनोदय जडला आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या साताऱ्याला फडणवीसांनी भाजपचा जिल्हा केला असला तरी बालेकिल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. दोन्ही छत्रपती भाजपात आले असले तरी अन्य सरदारांना घेतल्याशिवाय सातारा हा बालेकिल्ला होणे अवघड आहे. यातूनच सरदारांना बळ देण्याची मोहीम सुरू झाली आहे.
शंभूराजेंना चारही बाजूने घेरण्याची योजना
पालकमंत्री म्हणून गेल्या सहा वर्षापासून शंभूराज देसाईंची एकाधिकारशाही सुरू आहे. शंभूराजेंच्या शंभूराजेंच्या या पालकत्वाचा अनेक लोकप्रतिनिधींनी नाक मुरडून स्वीकार केलाय. सातारचे भोसले असोत की कराडचे पाटील-चव्हाण, दुष्काळातले गोरे शिंदे असो अनेकांना शंभूराजेंची पोटदुखी होतीच. याच दरम्यान, झालेल्या विधानसभा निवडणुकीत शंभूराजेंना चारही बाजूने घेरण्याची भाजपची रणनीती साकार झाली.
कारखाना -कारखाना, मनोज घोरपडे लांबच
विधानसभेनंतर सह्याद्रि कारखान्याचं रणकंद सुरू झालं. यात महायुती म्हणून शंभूराजेंनी भाजपच्या मनोज घोरपडेंना सहकार्य करणे अपेक्षित होते. विधानसभेचे राजकारण वेगळे आणि कारखान्याचे राजकारण वेगळे असते.
सह्याद्री आणि मरळी असं पूर्वापार सख्य असल्यामुळे पालकमंत्री असूनही शंभूराजेंनी निवडणुकीत सहकार्य केले नसल्याची तक्रार भाजपचे नवनियुक्त आमदार मनोज घोरपडेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली होती. याचाही रोष शंभूराजेंवर राहणार आहे
शिवेंद्रराजे पक्षाशी कटिबद्ध
शिवेंद्रराजे हे सध्या जिल्हयातले पालक नसले तरी बलाढ्य मंत्री म्हणून पुढे येत आहेत. निवडणूक काळामध्ये शंभूराजेंचं वारंवार जलमंदिरला येणे किंवा काही निमित्त काढून उदयनराजेंनी मरळी कारखान्यावर जाणं हा क्रम शिवेंद्रराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खटकणारा होताच. एकूणच शंभूराजे हे 'उदयनराजे गटातले' असा समज सातारकरांमध्ये कायम आहे.
तिन्हीकडे आमदार आणि चौथा खासदार
पाटण विधानसभा मतदारसंघाला कोकण सोहून तिन्ही बाजूंनी घेरणारा भाग हा कराड दक्षिण, कराड उत्तर आणि सातारा हा भाजपच्या अखत्यारित असतानाच पालकमंत्र्यांवर उदयनराजेंचे चौथे संकट आहे. सातारा शिवतीर्थावर लोकनेत्यांचे म्युरल असो की पालकमंत्र्यांच्या घरासमोर उदयनराजेंचं चित्र असो या दोघांच्या संबंधात तणाव वाढला गेला होता.
याच दरम्यान, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी पाटणकर आणि छत्रपती घराण्याचे थेट संबंध असल्याचे अनेक ऐतिहासिक पुरावे दिले आहेत. त्यामुळे तिन्ही बाजूंनी तीन आमदार आणि डोक्यावर चौथा खासदार अशी शंभूराजेंवर परिस्थिती आहे.
शंभूराजेंनी मरळी वगळता जिल्ल्याचं पालकत्व घेतलंच नाही
कोणत्याही जिल्हयासाठी मुख्यमंत्र्याखालोखाल पालकमंत्रीपद हे महत्वाचं असतं. पालकमंत्री झाल्यापासून शंभूराजेंनी फलटण, माण, खटाव, कोरेगाव, दक्षिण-उत्तर या मतदारसंघांत कोणताही ठसा उमटवला नाही. मकरंद पाटील हे जवळचे काहीही ठसा नसल्याचं स्पष्ट झालंय.
पूर्ण जिल्हा भाजपमय करायचा आहे
पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणारा सातारा आता महायुतीचा १०० टक्के बालेकिल्ला झाला आहे. यात सातारा, कराड दक्षिण-उत्तर आणि माण-खटाव हे मतदारसंघ भाजपकडे असले तरी कोरेगाव मतदारसंघ तत्वतः भाजपचाच आहे. वाई असो की फलटण हा अजितदादांसह भाजपात येऊ शकतो.
राहिला प्रश्न पाटण मतदारसंघाचा. त्यामुळे पाटण भाजपात येण्यासाठी यापुढे पक्षाकडून पूर्ण ताकद लावली जाईल. पाटण मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षापासून शंभूराज एकांगी सत्ता गाजवत असताना शांत पाटणकर यापुढे आक्रमक होऊन जिल्हयाच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकतात.
ये महायग्य कबसे शुरु हुआ है?
पाटणकरांचा भाजप प्रवेश ही आताची ठिणगी नसून याचा महायग्य लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच सुरू आहे. पाटणकर राष्ट्रवादीत असताना त्यांचा विरोध पत्करल्यामुळे लोकसभेची उमेदवारी श्रीनिवास पाटलांना सोडून शशिकांत शिंदेंना द्यावी लागली. त्यामुळे शशिकांत शिंदेंना उमेदवारी देऊन शरद पवारांना पराभव स्वीकारावा लागला.
लोकसभेचा पराभव उरी लागल्यामुळेच पवारांनी सत्यजित पाटणकरांच्या उमेदवारीसाठी उद्धवकडे शब्द टाकला नाही. हा घटनाक्रम कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक असला तरी दूरगामी राजकारणाला अपेक्षित होता. सत्यजित यांनी उमेदवारी नसताना निवडणूक लढली. गेल्या दीड वर्षातील राजकारणाचा परिपाठ आता सुरू झाला आहे.
साडू का साडू, बंधू नही हो सकता
शंभूराजेंचा मतदारसंघ काही अंशी कराह दक्षिणवर अवलंबून आहे. इथं उंडाळकर गटाचे पानिपत करत पृथ्वीराज चव्हाण आणि आता अतुल भोसलेंनी आक्रमण केले आहे. यापुढेही अतुल आणि उदयसिंह हा लढा कायम राहिल. उदयसिंह पाटील आणि शंभूराज हे दोघे सख्खे साहू, यामुळे साडूसाहूंचे नाते कायम राहिल आणि अतुल भोसले शंभूराजेंच्या कधीच राजकीय जवळीकीत येणार नाहीत.