Devendra Fadanavis: ईश्वरपुरात रविवारी मुख्यमंत्र्यांची सभा
अॅङ चिमण डांगे : सायंकाळी गांधी चौकात आयोजन
ईश्वरपूर: उरुण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुक महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा रविवार ३० रोजी सायंकाळी साडे चार वाजता गांधी चौकात होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हयातील महायुतीचे खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अॅड राजेंद्र उर्फ चिमण डांगे यांनी पत्रकार बैठकीत दिली.
यावेळी भाजपाचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडीक, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादागटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, तालुका प्रमुख सागर मलगुंडे, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत, सतिश महाडीक उपस्थित होते.
अॅङ डांगे म्हणाले, उरुण ईश्वरपूर पालिका निवडणूक ही राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व अन्य घटक पश्न एकीने महायुती म्हणून एकत्र लढत आहेत. या सभेला आ. सदाभाऊ खोत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहतील. या निवडणुकीत महायुतीला चांगला प्रतिसाद आहे. निशिकांत पाटील म्हणाले, या सभेला मुख्यमंत्री उरुण ईश्वरपूरचे पुढील ५ वर्षाचे व्हिजन काय असणार आहे हे सांगतील. त्याचा निवडणुकीवर सकारात्मक परिणाम होईल.
फडणवीस यांनी ही निवडणूक गांभिर्याने घेतली असून महायुतीने निवडणूक जिंकण्यासाठी लढवीत आहे. निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्ष व ३० नगरसेवक निवडून येतील. सभेत पालिकेचा १७२ वर्षाच्या इतिहासाला उजाळा देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री विकासासाठी निधी कमी पडू देणार नाहीत.
राहुल महाडीक म्हणाले, पालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर उरुण ईश्वरपूर शहरात महायुती होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केल्यानंतर महायुती झाली. प्रत्येक पक्षाला संधी देण्याचे काम केले आहे.