महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसमध्येच! भाजपमध्ये जाणार हि अफवा- माजी मंत्री मधुकरराव चव्हाण

12:11 PM Apr 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

फडणवीसांची फक्त औपाचारिक भेट

Advertisement

माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण हे लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची फेक बातमी मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. या बातमीमुळे तुळजापूर तालुक्यात दिवसभर राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले होते. मात्र, मधुकर चव्हाण यांनी या बातमीचे खंडण केले असून शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षामुळेच मी इथपर्यंत पोचलो असून मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. कार्यकर्त्यांनी खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर लोकसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मंगळवारी सोलापूरमध्ये दाखल झाले होते. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे कार्यक्रमा निम्मित त्यांच्या नातेवाईकांकडे जात होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मधुकरराव चव्हाण यांची औपचारिक भेट झाली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन माजी. मंत्री चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याचा मजकूर व्हायरल करण्यात आला होता. मात्र, हि भेट केवळ औपचारिक भेट होती. कोणीही याच चुकीचा अर्थ काढू नये शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे ठाम मतं मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :
Devendra Fadnavisr Lok Sabha ConstituencyRam Satpute Solapur
Next Article