कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

CM फडणवीस-शिंदेंमध्ये राजकीय पॉवर वॉर, दिल्ली दौरे नेमके कशासाठी?

12:31 PM Aug 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पडती बाजू घ्यावयास लागू नये, यासाठी शिंदे यांचा जोरदार प्रयत्न सुरू

Advertisement

Devendra Fadnavis And Eknath Shinde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार पॉवर वॉर सुरू आहे. मागील महिन्यात 4 वेळा दिल्ली दौरा करुन शिंदे यांनी आपली फळी भक्कम करण्याचा प्रयत्न केला असून दिल्लीश्वरांनी तात्पुरता तोडगा काढला आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्याच्या राजकारणासाठी दिशादर्शक ठरणार आहेत. पडती बाजू घ्यावयास लागू नये, यासाठी शिंदे यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.

Advertisement

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या सत्तासंघर्षाचा एक नवा टप्पा सुरू झाला आहे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणाव आता उघडपणे जाणवू लागला आहे. हा वाद केवळ वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नसून, तो पक्षीय हितसंबंध, मंत्रालयीन अधिकारांचे वाटप आणि आगामी निवडणुकांची तयारी या तिन्ही घटकांशी निगडित आहे.

शिंदे यांचे अलीकडील दिल्ली दौरे या सत्तासंघर्षाला नवा वेग देत आहेत. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आणि ते भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्या हातात गेले. शिंदे उपमुख्यमंत्री झाले असले तरी सत्तेत मानाचे पान मिळत नसल्याने त्यांच्या गटात असंतोष आहे.

सत्तासंघर्षाची ठिणगी

अधिकारांचे वाटप, प्रकल्प थांबवणे आणि चौकशी आदेश यामुळे सत्तासंघर्षाची ठिणगी पडली आहे. फडणवीस यांनी शिंदे कार्यकाळातील काही योजनांना विराम दिला. तर काहींवर चौकशी लावल्यामुळे शिंदे गटात नाराजी वाढली. मंत्रालयात दोन वेगवेगळ्या कार्यालयांची स्थापना या दरीचे प्रतीक ठरली.

बेस्ट’च्या महाव्यवस्थापक नियुक्तीवरुन हा संघर्ष उघडपणे दिसून आला. फडणवीस यांनी आशिष शर्मा, तर शिंदे यांनी अश्विनी जोशी यांची नियुक्ती जाहीर केली. यामुळे सरकारी यंत्रणेत गोंधळ निर्माण झाला.

शिंदे गटात राजकीय अस्वस्थता

तत्पूर्वी शिंदे गटातील काही मंत्र्यांवरील आरोपांनीही वातावरण तापवले. संजय शिरसाट यांचा नोटांनी भरलेल्या बॅगांचा व्हिडिओ व्हायरल होणे, योगेश कदम यांच्या नातेवाईकांच्या डान्स बारवर छापे, शिंदे गटातील एका मंत्र्याच्या हॉटेलची उच्चस्तरीय चौकशी हा निव्वळ योगायोग नसून पॉवर वॉरचा भाग आहे. नगर विकास खात्यातील

निवडणुकांची पार्श्वभूमी

आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा संघर्ष ठरवू शकतात. दिल्लीकडून शिंदे यांना हमी मिळाली तरी फडणवीस यांचा प्रभाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. काही विश्लेषकांच्या मते, हा कलह महायुतीला कमकुवत करू शकतो. आणि विरोधकांना संधी देऊ शकतो.

शिंदे यांनी एकजुटीचा दावा करत ’विकास हाच आमचा अजेंडा’ अशी भूमिका घेतली आहे. भाजपच्या गोठातून कोणतीही प्रतिक्रिया येत नसली तरी थेट करेक्ट कार्यक्रम होत असल्याने शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे. अश्विनी जोशी यांची नियुक्ती जाहीर केली. यामुळे सरकारी यंत्रणेत गोंधळ निर्माण झाला.

शिंदे गटात राजकीय अस्वस्थता

तत्पूर्वी शिंदे गटातील काही मंत्र्यांवरील आरोपांनीही वातावरण तापवले. संजय शिरसाट यांचा नोटांनी भरलेल्या बॅगांचा व्हिडिओ व्हायरल होणे, योगेश कदम यांच्या नातेवाईकांच्या डान्स बारवर छापे, शिंदे गटातील एका मंत्र्याच्या हॉटेलची उच्चस्तरीय चौकशी हा निव्वळ योगायोग नसून पॉवर वॉरचा भाग आहे. नगर विकास खात्यातील

Advertisement
Tags :
@BJP_NEWS# Congress MP#devendra fadanvis#Eknath Shinde#sthanik swarajy sanstha elections 2025#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaShivSena Shinde faction
Next Article