स्केटिंग स्पर्धेसाठी देवेन बामणेची निवड
10:32 AM Oct 17, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर व आर. एल. एस. कॉलेजचा विद्यार्थी देवेन बामणेची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही निवड चाचणी मोहाली-चंदीगड येथे झाली. देवेन हा गेली 8 वर्षे स्केटिंग प्रशिक्षण घेतले. त्याची ही निवड चाचणी स्पीड सालोम या प्रकारात झाली असून सिंगापूर येथे दि. 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. बेळगावचा स्केटर देवेन बामणे भारतीय स्केटिंग संघामधून आपले कौशल्य दाखवणार आहे. प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, आई ज्योती व वडील विनोद बामणे यांचे त्याला मार्गदर्शन मिळत आहे. आरएलएस कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कामगोळ, बेळगाव जिल्हा स्केटिंग असो अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article