For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्केटिंग स्पर्धेसाठी देवेन बामणेची निवड

10:32 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्केटिंग स्पर्धेसाठी देवेन बामणेची निवड
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर व आर. एल. एस. कॉलेजचा विद्यार्थी देवेन बामणेची जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही निवड चाचणी मोहाली-चंदीगड येथे झाली. देवेन हा गेली 8 वर्षे स्केटिंग प्रशिक्षण घेतले. त्याची ही निवड चाचणी स्पीड सालोम या प्रकारात झाली असून सिंगापूर येथे दि. 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. बेळगावचा स्केटर देवेन बामणे भारतीय स्केटिंग संघामधून आपले कौशल्य दाखवणार आहे. प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर,  आई ज्योती व वडील विनोद बामणे यांचे त्याला मार्गदर्शन मिळत आहे. आरएलएस कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कामगोळ, बेळगाव जिल्हा स्केटिंग असो अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.