आशियाई स्केटिंग स्पर्धेसाठी देवेन बामणेची निवड
बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन स्केटर व आर. एल. एस. माहविद्यालयचा विद्यार्थी देवेन बामणे आशियाई स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मोहाली चंदिगड येथे झालेल्या राष्ट्रीयस्तरावर स्पीड सालोम स्केटिंग या प्रकारात निवड चाचणीमध्ये आतुलनीय कामगिरी करत त्यांची निवड आशियाई स्पर्धेसाठी झली आहे. सप्टेंबर महिन्यात कोरिया येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत बेळगावचा देवेन बामणे भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. राष्ट्रीयस्तरीय झालेल्या निवड चाचणीनंतर सोमवारी बेळगाव विमानतळावर देवेनचे आगमन झाल्यावर त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बेळगांव जिल्हाचे स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर पुष्पहार घालून स्वागत केले. आई ज्योती बामणे, वडील विनोद बामणे, चौकसिंग पुरोहित, बसवराज कोरीशेट्टी, लीना कोरीशेट्टी, अवनिश कोरीशेट्टी व इतर मान्यवर उपस्थित होते. देवेन हा स्केटिंग प्रशिक्षक मंजुनाथ मंडोळकरंच्या मार्गर्शनाखाली सराव करत असून त्याला कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सेक्रेटरी इंदूधर सीताराम, आरएलएस कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कामगोळ, बेळगांव जिल्हा स्केटिंग असोसिएशनच अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, सूर्यकांत हिंडलगेकर, शिवराज या सर्वांचे प्रोत्साहन मिळत आहे.