काँग्रेसला हटविल्याशिवाय राज्याचा विकास अशक्य : भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र
बेंगळूर : जोपर्यंत काँग्रेस सरकार हटवले जात नाही तोपर्यंत राज्यात विकास होणार नाही. तसेच नागरिकांसाठी सुरक्षितता नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला. रविवारी त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. असुरक्षित कर्नाटकात सभ्य नागरिक आणि निष्पाप लोक राहू शकणार नाहीत असे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसला हटवा, कर्नाटकला वाचवा, असा नाराही त्यांनी दिला. कारागृहात कैद्यांना दिल्या शाही बडदास्तला अंत दिसत नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे. बलात्कार, खून, दरोड्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी या सरकारची वचनबद्धता दिसत नाही. गुन्हेगार आणि देशद्रोही गुन्हेगारी कृत्ये करण्यास कोणालाही घाबरत नाहीत. कारण त्यांना खात्री आहे की जर त्यांनी गुन्हा केला आणि अटक केली तर त्यांना तुरुंगात शाही आदरातिथ्य दिले जाते. परप्पन अग्रहारमध्ये देशद्रोही, अतिरेकी आणि खुनी कैद्यांना विशेष सुविधा मिळत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.