स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आमगावात सुविधांचा वनवा
बेळगाव / प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून आजपर्यंत दुर्गम भागात इथल्या शासकीय सुविधा आणि सेवा पोहचू शकल्या नाहीत.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील चिखली गावापासून 6 किमी अंतरावर असणार आमगाव, हे दुर्गम भागातील 740 लोकसंख्येचं गाव आहे. इथं आज ही सेवा आणि सुविधांचा वनवा पाहायला मिळत आहे. प्रामुख्याने रस्ता व ब्रिजची मागणीसाठी आमगावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करून निवेदन दिले. रस्ता, पाणी, वीज, वाहतूक व आरोग्य सुविधांचा तुटवडा कायम जाणवत असतो. हिंस्र व जंगली प्राण्यांची भीती येथे लोकांना कायम आहे. सहा किलोमीटर अंतरावरून रेशन डोक्यावर आणावे लागते . आरोग्य केंद्र व रस्त्याची सुविधा नसल्यामुळे प्रसुतीसाठी महिलांना परगावी पाठवावे लागते. शाळा आहे परंतु शिक्षक नाही, गावाला 25 वर्षांपूर्वी रस्ता मंजूर होऊन अजून ही काम झाले नाही. चिखली ते आमगाव डांबरीकर प्रामुख्याने करावे ही मागणी नागरिकांची केली आहे.