महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एमएसडीएफ संघाकडे डेव्हलपमेंट चषक

09:52 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : हावेरी येथील राणेबेन्नूर येथे हावेरी जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित जिल्हास्तरीय प्लेयर डेव्हलपमेंट 16 वर्षाखालील साखळी फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एमएसडीएफ संघाने डी युनिट संघाचा टायब्रेकरमध्ये 5-4 पराभव करून जिल्हा डेव्हलपमेंट चषक पटकाविला. राणेबेन्नूर येथे इदू एशिया आंतरराष्ट्रीय स्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या पाच जिह्याच्या फुटबॉल स्पर्धेत पहिल्या साखळी सामन्यात एमएसडीएफ संघाने डी युनिट संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात आईस सराफने 2, गौरंग उच्चुकर व ध्रुव नाईक त्यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात एमएसडीएफ संघाने चिक्कमंगळूर संघाचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात गौरांग उच्चुकरने 2, तर माहित भडकली व आदम खान यांनी प्रत्येकी एक गोल केला. तिसऱ्या सामन्यात एमएसडीएफ संघाने दावणगिरी जिह्याचा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात आऊष नाकाडी, गौरांग उच्चुकर, जीत हरिहर, रिजवान उजगावकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. अंतिम सामन्यात एमएसडीएफ संघाने डी युनायटेड फुटबॉल अकादमीचा टायब्रेकरमध्ये 5-4 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये एमएसडीएफ संघाने 5-4 असा विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. या संघात उझर रोटीवाले, आजम खान, गौरांग उच्चूकर, रिजवान उजगावकर, माहित भडकली, स्वयंम भावी, ध्रुव नाईक, जीत हरिहर, चेतन उतनाळ, स्वयंम कपिलेश्वरी, रिहान शेख, अर्जुन सानीकोप्प, मुरसालीन सनवाले, आऊष नाकाडी, आईस सराफ आदी खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला फुटबॉल प्रशिक्षक मानस नायक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article