महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोवावेस येथील संत बसवेश्वर उद्यानाचा विकास करा

10:55 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा गोवावेस येथील बसवेश्वर उद्यान परिसर विकासापासून दूर आहे. जगाला समतेचे ज्ञान देणाऱ्या बसवाण्णांच्या उद्यानाचा बेंगळूरच्या धर्तीवर विकास साधावा, अशी मागणी बसव कायक जीविगळ संघाच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. संत बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे बसवेश्वर उद्यान आहे. मागील अनेक वर्षांपासून या उद्यानाचा विकास करण्यात आलेला नाही. शहरातील इतर उद्यानांचा विकास होत असताना या उद्यानाच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. बेंगळूर येथे ज्या पद्धतीने बसवेश्वर सर्कलचा विकास करण्यात आला, त्याचप्रकारे 50 फूट उंच बसवेश्वरांची मूर्ती बसवून या परिसराचा विकास करण्याची मागणी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी आपण यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.यावेळी लिंगायत व बसव संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article