For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

दाणोली - देवसु -पारपोली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

03:37 PM Jan 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
दाणोली   देवसु  पारपोली रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

देवसू ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे वेधणार लक्ष

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
दाणोली - देवसु -पारपोली या सुमारे पाच किमीच्या या रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गानेही दुर्लक्ष केले असुन याचा फटका या तीन गावातील वाहन चालकांना बसणार आहे. याची तात्काळ दखल न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचा इशारा देवसू ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश सावंत यांनी दिला आहे.याबाबत देवसु ग्रामपंचायतीने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकानुसार, गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाला मंजुरी मिळाली. मात्र संबधित ठेकेदाराने या कामाला सुरुवात करताना या रस्त्याची सुरुवातीची लेयर टॅक कोट न करताच धूळ व माती मिश्रित जमिनीवर दगडांची रचना करून अशास्त्रीय पद्धतीने केली. त्यामुळे हा रस्ता फार काळ टिकणार नसुन लाखो रुपयाचा निधी वाया जाणार आहे. विशेष म्हणजे हे माहित असूनही हे काम सुरू आहे. या पुरावा म्हणून या निकृष्ट दर्जाच्या कामाचे फोटो व व्हिडिओ ग्रामपंचायत इकडे उपलब्ध आहेत.सध्या सुरू असलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गानेही दुर्लक्ष केले असुन ते कामाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याची ग्रामपंचायतीची तक्रार आहे.तसेच निकृष्ट कामाबाबत जाब विचारला असता ठेकेदार उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे या निकृष्ट दर्जाच्या कामासह संबधित ठेकेदाराच्या अरेरावी बाबत व अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षाबाबत लवकरच केसरी निवासस्थानी येणाऱ्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचा इशारा देवसू ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश सावंत यांनी दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.