महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देवगिरी-मण्णीकेरी श्री महालक्ष्मी यात्रा आजपासून

10:28 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पै-पाहुण्यांच्या स्वागतासाठी दोन्ही गावे सज्ज : देवगिरीची 9 वर्षांनी तर  मण्णीकेरीची तब्बल 21 वर्षांनी यात्रा

Advertisement

वार्ताहर /कडोली

Advertisement

देवगिरी आणि मण्णीकेरी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला मंगळवार दि. 14 पासून प्रारंभ होत असून पै-पाहुण्यांच्या स्वागतासाठी दोन्ही गावे सज्ज झाली आहेत. देवगिरी गावची श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 9 वर्षांनी होत असून ही यात्रा पाच दिवस चालणार आहे. तर मण्णीकेरी गावची श्री महालक्ष्मी यात्रा तब्बल 21 वर्षांनी होत असून ही यात्रा 9 दिवस भरणार आहे.

देवगिरी यात्रेची 18 रोजी सांगता

देवगिरी येथे मंगळवार दि. 14 रोजी सूर्योदयाला अक्षतारोपणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी 9 वाजता देवीची मिरवणूक निघणार आहे. बुधवार दि. 15 रोजी सायंकाळी देवी गदगेवर स्थानापन्न झाल्यानंतर ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यात्राकाळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात स्वच्छता मोहीम, मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दि. 18 रोजी यात्रेची सांगता होणार आहे.

मण्णीकेरीची यात्रा दि. 22 पर्यंत

मण्णीकेरी येथे मंगळवारी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. बुधवारी सूर्योदयाला अक्षतारोपण होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता रथोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यासाठी आकर्षक अशी रथाची बांधणी करण्यात आली आहे. सायंकाळी 6 वाजता महालक्ष्मी देवी गदगेवर स्थानापन्न होणार आहे. सदर यात्रा दि. 22 पर्यंत भरणार असून यात्रा काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रस्त्यांच्या डागडुजीसह चोख पोलीस बंदोबस्त

यात्रा काळात भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. शिवाय नव्याने गटारी बांधण्यात आल्या आहेत. मण्णीकेरी गावात येण्यासाठी कडोली, केदनूर, अगसगा, हंदिगनूर आदी गावांहून संपर्क रस्त्यांची सोय करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article