महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अंजली निंबाळकर यांना निवडून आणण्याचा निर्धार

10:30 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यशवंत बिरजे, विनायक मुतगेकर यासह अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : निंबाळकर यांना मताधिक्य देण्याचे आवाहन

Advertisement

खानापूर : स्वातंत्र्यानंतर खानापूर मतदारसंघात पहिल्यांदाच खासदारकीची उमेदवारी काँग्रेसने दिली आहे. खानापूरचा प्रतिनिधी दिल्लीत पोहचविण्याची संधी काँग्रेसने खानापूर तालुक्यातील जनतेला दिली आहे. या संधीचा उपयोग करत दिल्लीतील लोकसभेत खानापूरचा आवाज उमटवण्यासाठी खानापूर तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले राजकारण बाजूला सारुन अंजली निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन यशवंत बिरजे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना जाहीर केले. येथील शिवस्मारकातील व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा केली. यावेळी ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, तुकाराम अल्लोळकर, ईश्वर बोबाटे, राजू पाटील, गुंडू खांबले, हुवाणी अल्लोळकर यासह अनेकजण उपस्थित होते. येत्या काही दिवसात काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Advertisement

यावेळी बोलताना यशवंत बिरजे म्हणाले, आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून आंबेडकरांनी देशाला संविधान दिले आहे. या संविधानावरच देशाची वाटचाल सुरू आहे. मात्र अलीकडे हुकुमशाही पद्धतीने दिल्लीतील भाजप सरकार वागत असून संविधान बदलण्याचा घाट घातलेला आहे. यासाठी देशात भाजप विचारसरणीच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या निवडणुकीत कारवार मतदारसंघातून खानापूरला प्रथमच उमेदवारी देण्यात आलेली आहे. यासाठी काँग्रेसचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे. त्यातच माजी आमदार अंजली निंबाळकर या महिला नेत्याना उमेदवारी देत मराठा समाजाला नेतृत्व दिल्याने मराठा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. बी. पी. कदम यांच्यानंतर निंबाळकर या मराठा उमेदवाराला काँग्रेसने संधी दिल्याने मराठा समाजाचे नेतृत्व दिल्लीत पोहचविण्यासाठी कारवार मतदारसंघातील सर्व मराठा समाजाने एकत्रितपणे अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. खानापूर विधानसभा मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीत गेल्या 30 वर्षापासून भाजपला कायमच प्रचंड मताधिक्य देण्यात येत होते. मात्र भाजपच्या खासदारांनी खानापूर तालुक्यासाठी काहीही केलेले नाही. तालुक्यातील भाजप नेतृत्वाने उमेदवारी मिळवण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे खानापूर तालुक्यावर कायम अन्यायच झालेला आहे. मात्र काँग्रेसने माजी आमदार अंजली निंबाळकर यांना संधी दिल्याने खानापूर तालुक्यातील जनतेने भरघोस मताधिक्य देणे गरजेचे आहे.

तालुका ग्रा. पं. सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर म्हणाले, भाजपने कारवार मतदारसंघाचे 30 वर्षे नेतृत्व केले आहे. मात्र अनंतकुमार हेगडेंसारख्या खासदारांनी खानापूर तालुक्यासाठी काहीही विकासासाठी निधी दिलेला नाही. मात्र भाजपचे तालुक्याचे पदाधिकारी आणि नेते मतदारांची दिशाभूल करून मताधिक्य देत राहिले. आणि खासदारांची हुजरेगिरी करण्यातच धन्यता मानले. भाजपला मताधिक्य देऊनसुद्धा खानापूर तालुक्यासाठी एक रु. चाही निधी दिलेला नाही. मात्र अंजली निंबाळकर या आमदार असताना कोट्यावधीचा निधी आणून विकासकामे केली आहेत. तसेच काँग्रेसचे आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील अनेक विकासकामे पूर्ण झालेली आहेत. काँग्रेस हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष असून आज देशात भाजपने केलेली परिस्थिती पाहता काँग्रेसच देशाला तारु शकतो. यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत. या संधीचे सोने करण्याची वेळ आम्हा खानापूरवासियांवर आहे. यासाठी तालुक्यातील तमाम जनतेने राजकारण बाजूला ठेवून माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article