20 जूनला झळकणार डिटेक्टिव्ह शेरदिल
दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा आगामी चित्रपट ‘डिटेक्टिव्ह शेरदिल’ चालू महिन्यातच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अली अब्बास जफरने केली आहे.
सुमारे तीन वर्षांच्या विलंबानंतर हा चित्रपट 20 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित होणार आहे. निर्माता अली अब्बास जफरने या चित्रपटाचे पोस्ट जारी केले आहे. या मिस्ट्री कॉमेडी चित्रपटाचे चित्रिकरण अनेक वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते. परंतु अज्ञात कारणांमुळे याचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन रवि छाबडियाने केले आहे. या चित्रपटात दिलजीत एका हेराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. त्याच्यासोबत सुमित व्यास, डायना पेंटी, बनिता संधू, चंकी पांडे, बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाह देखील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून येतील. डिटेक्टिव्ह शेरदिल हा दिलजीत आणि अली अब्बास जफर यांनी एकत्रित केलेला दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी दोघांनी जोगी या चित्रपटात एकत्र काम केले होते. याचबरोबर दिलजीत हा सरदार जी 3 चित्रपटात दिसून येणार असून तो 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.